महागाईस दोन्ही सरकारे जबाबदार; परशुराम उपरकर

केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी अच्छे दिन येणार असे गाजर सर्वसामान्य जनतेला दाखवले होते.
Parshuram Uparkar
Parshuram UparkarSakal
Updated on

कणकवली - केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी अच्छे दिन येणार असे गाजर सर्वसामान्य जनतेला दाखवले होते; मात्र इंधनाच्या दरवाढीबरोबरच स्वयंपाक गॅसची दरवाढ झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. याला दोन्ही सरकारे जबाबदार आहेत. या विरोधात जनतेने आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे मत मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात ते बोलत होते. श्री. उपरकर म्हणाले, 'निवडणुकीमध्ये जनतेला केवळ आश्वासने द्यायची आणि नेहमी फसवणूक करायची असे लोक प्रतिनिधी वावरत आहेत. त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. राज्य आणि केंद्राने जनतेला महागाईच्या आणि बेरोजगारीच्या दरीत ढकले आहे. आतापर्यंत मराठवाड्यातच आत्महत्या होत होत्या; पण सिंधुदुर्गातही आत्महत्याची प्रकार घडू लागले. त्याला सरकारचे प्रतिनिधी जबाबदार आहेत. राज्यभरात वेगवेगळी प्रकरणी घडवायची आणि जनतेचे लक्ष विचलित करायचे असे प्रकार सुरू आहेत. जनतेच्या माथी महागाई मारायची आणि विकासापासून दूर ठेवायचे असाही प्रयत्न सुरू झाला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना साथरोगाचे कारण पुढे करून सरकारची तिजोरी खडखडाट आहे असे सांगायचे आणि वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू होता. सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे जनता बेहाल झाली आहे. जिल्ह्याचा विकासही होत नाही.

Parshuram Uparkar
कलादालनात पर्यटक रममाण; कलेला सलाम

ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सरकारमधील सत्ताधारी पक्ष आंदोलने करून आपण जनतेसाठी काहीतरी करतो आहोत असे भासवत आहेत. राज्याकडून शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, विकासकामे होत नाहीत, कुडाळमध्ये महिलांसाठी विशेष रुग्णालय सुरू करण्याची घोषणा सात वर्षांपूर्वी झाली; पण अजूनही सुरू झाले नाही. जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे; मात्र त्यात त्रुटी भरून काढल्या जात नाही. नको तो खेळ लोकप्रतिनिधींचा सुरू आहे. जसे विमानतळाचे झाले तसेच या मेडिकल कॉलेजचा खेळखंडोबा सुरू आहे. याबाबत लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची वेळ आली आहे. जनतेने यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. यासाठी मनसे जनतेबरोबर राहील.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.