Brahmanwadi News : मोटार गॅरेजच्या दुकानाला आग लागून साडेसात लाखाचे नुकसान

ब्राम्हणवाडी येथील मिलिंद जोशी यांच्या गाळ्यामध्ये असणाऱ्या मोटार गॅरेजच्या दुकानाला आग लागून ७.५० लाखाचे नुकसान झाले आहे.
Motor Garage Fire
Motor Garage FireSakal
Updated on

हर्णै - येथील ब्राम्हणवाडी येथील मिलिंद जोशी यांच्या गाळ्यामध्ये असणाऱ्या मोटार गॅरेजच्या दुकानाला आग लागून ७.५० लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास गॅरेजचा मालक अभिषेक राजभर हा आपलं गॅरेज बंद करून घरी गेला होता. तोच साधारण १५ मिनिटांच्या अवधीनंतर अचानक धूर येऊ लागला. सदरचा येणारा धूर शेजारच्या एका महिलेने बघितला आणि तिने आग लागली म्हणून शेजारच्या दुकानात जाऊन सांगितले. तोपर्यंत आत गाळ्यामध्ये अग्नीने रौद्ररूप धारण केले होते.

लगेच सर्व त्याठिकाणी आजूबाजूचे ग्रामस्थ जमून भेटेल तिथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. दुकानाचे छप्पर कौलारु असल्याने आग चांगलीच भडकत होती. आजूबाजूला असणाऱ्या गाळाधारकांचे धाबे दणाणले. जो तो आपापले समान घाईघाईने लांब असणाऱ्या गाळ्यांमध्ये नेऊन ठेवत होता.

अशाचवेळी सुनिल आंबूर्ले, मोरू आंबूर्ले, शार्दूल नरवणकर यांनी आपल्या पाण्याने भरलेल्या टँकरच्या गाड्या हजर केल्या आणि त्यातच बाजूला असणाऱ्या विहिरीचा पाण्याचा पंप सुरू केला आणि सगळीकडून पाण्याचा मारा सुरू केला तेंव्हा आग आटोक्यात आली. याचवेळी सागर मयेकर यांनी देखील आपले फवारणीचे पंप पाणी फवारणी करिता हजर केले.

शेजारील दुकानदारांचे समान घटनास्थळावरून हलवण्यासाठी ग्रामस्थांनी बहुमोल सहकार्य केले. यावेळी रवींद्र बोंडकर यांचे दुकान लागूनच होते. त्यांचे स्टेशनरी व महा इ सेवा केंद्र असल्याने त्यांचेदेखील या घटनेमध्ये नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने अभिषेक राजभर याचे ३ लाख तर उर्वरित नुकसान संबंधित इमारतीचे आहे.

यावेळी दापोली नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या बंबासाठी संपर्क करण्यात आला असता सदरचा बंब बिघडला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खेड नगरपरिषदेचा बंब तातडीने मागवण्यात आला. तो येईपर्यंत आग पूर्णपणे विझली होती.

हर्णै परिसरामध्ये असे अनेक प्रसंग घडले आहेत पूर्णपणे जळून खाक झाल्यावरच बंब येतो त्यामुळे हर्णै ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली एखाद्या बंबाची व्यवस्था याठिकाणी तातडीने करावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी तहसीलदार श्रीम.बोंबे यांच्याकडे केली.

घटनास्थळी दापोली तहसिलदार श्रीम. अर्चना बोंबे, नायब तहसिलदार - श्री. आडमुठे, हर्णेच्या तलाठी - संध्या अधिकारी, मंडल अधिकारी - विनोद जाधव, कोतवाल - राखी खेडेकर, हर्णै ग्रामपंचायत सरपंच ऐश्वर्या धाडवे आदी ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.