‘गड्या आपली ग्रामपंचायतच बरी’

budget of finance commission deposited directly in gram panchayat election and new decision of candid in ratnagiri
budget of finance commission deposited directly in gram panchayat election and new decision of candid in ratnagiri
Updated on

दाभोळ (रत्नागिरी) : केंद्र शासनाकडून वित्त आयोगाचा निधी आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा होऊ लागल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीचे महत्त्व हळूहळू कमी होऊ लागल्याने पर्यायाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचेही महत्त्व कमी होत आहे. ‘गड्या आपली ग्रामपंचायतच बरी’ असे म्हणत दाभोळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुनील तोडणकर यांनी दाभोळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

ते दाभोळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. २ मधून निवडणूक लढवत असल्याने तालुक्‍यातील राजकीय जाणकांराकडून आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व समित्यांची सभापती पदे शिवसेनेच्याच सदस्यांकडे आहेत. शिवसेनेचेच बहुमत असल्याने राष्ट्रवादी व अन्य पक्षांच्या सदस्यांना विकासकामांना यामुळे निधी कमी प्रमाणात मिळतो. 

शंकर (दादू) मुरमुरे विरोधात

सुनील तोडणकर हे शिवसेना, राष्ट्रवादीच्या गाव पॅनेलमधून ही निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात उदय जावकर यांच्या पॅनेलमधून शंकर (दादू) मुरमुरे ही निवडणूक लढवीत आहेत. 
दाभोळ ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदही भूषवले दाभोळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुनील तोडणकर हे जिल्हा परिषद सदस्य होण्याअगोदर दाभोळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते. सरपंचपद रिक्‍त असल्याने ग्रामपंचायतीची सत्ता त्यांच्याकडेच असल्याने सरपंचपदाचे महत्व त्यांना माहित आहे. जिल्हा परिषद सदस्यापेक्षा ग्रामपंचायतच बरी, असे त्यांचे म्हणणे आहे.

एक नजर

  • विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाआघाडीचे सरकार 
  • महाआघाडीमुळे तरी जिल्हा परिषदेतील स्थिती बदलण्याची होती अपेक्षा
  • कोणताही बदल झाला नाही; मागील वर्षे गेले कोरोनाच्या प्रभावाखाली 
  • राज्य शासनाकडून विकासकामांना मिळणाऱ्या निधीला कात्री 
  • विकासकामांची गती थंडावली असल्याने व्यक्त होतेय नाराजी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.