Ratnagiri : 'तुम्ही मागासवर्गीय आहात, जाकादेवीत राहिलात तर रॉकेल टाकून पेटवून देऊ'; चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटी गुन्हा

तुम्ही जाकादेवी येथे राहू शकत नाही. तुम्ही आत्ताच्या आता घर खाली करा, अशी धमकी दिली.
Mumbai Crime News
Mumbai Crime News esakal
Updated on
Summary

संशयितांनी काही कारण नसताना फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली तसेच फिर्यादी यांना जातीवरून बोलले.

रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी (Jakadevi Ratnagiri) येथे लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या चार संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस (Ratnagiri Police) ठाण्यात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक देसाई, सुधीर देसाई, बंड्या देसाई, दत्ता देसाई अशी संशयितांची नावे आहेत.

हा प्रकार २९ व ३० मार्च २०२३ ला सायंकाळी जाकादेवी येथे घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी काही कारण नसताना फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली तसेच फिर्यादी यांना जातीवरून बोलले.

Mumbai Crime News
Sangli : राजकारण तापलं! लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 'हे' दोन बडे नेते एकत्र; भेटीत कोणती झाली चर्चा?

तुम्ही जाकादेवी येथे राहू शकत नाही. तुम्ही आत्ताच्या आता घर खाली करा, अशी धमकी दिली. ३० मार्चला फिर्यादी हे कामासाठी बाहेर जात असताना त्यांच्या गाडीभोवती चिरे लावले म्हणून त्यांच्या आईने संशयितांना विचारणा केली असता संशयित दत्ता देसाई यांनी तुमच्या मुलाला आम्हाला जीवे ठार मारायचे आहे. तोपर्यंत गाडी आमच्या ताब्यात राहील. तुम्ही मागासवर्गीय आहात.

Mumbai Crime News
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळ; 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेलाच राहणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जाकादेवीत राहिलात तर तुला रॉकेल टाकून पेटवून देऊ, असे बोलून संशयितांनी सायंकाळी सात ते आठ या वेळेत सेंट्रल बॅंक जाकादेवी येथे पुन्हा बोलवून धमकी दिली अशी फिर्याद ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून संशयितांविरुद्ध अॅट्रॉसिटी (Atrocity Act) गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai Crime News
Mumbai : दीड वर्षाची चिमुरडी आईच्या कुशीत निजलेली, तितक्यात अपहरणकर्त्यानं..; रेल्वेतील थरारक घटना समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.