US Woman Sindhudurg: जंगलात साखळीने बांधून ठेवलेल्या अमेरिकन महिलेचा जबाब; पतीला ताब्यात घेतल्यानंतर उलगडणार घटनेचं रहस्य

American Woman Chained to Tree Sindhudurg Forest : सदर प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
US Woman Sindhudurg
US Woman Sindhudurgesakal
Updated on
Summary

अमेरिकन दुतावासाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

बांदा (सिंधुदुर्ग) : रोणापाल येथील जंगलात (Ronapal Forest) लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या अमेरिकन महिलेच्या (American Woman) सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा बांदा पोलिस ठाण्यात (Banda Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची (Sindhudurg Police) दोन पथके तिच्या तामिळनाडू येथील मूळ पत्त्यावर तपासकामी गेली असून तेथील तपासानंतर सत्यता समोर येणार आहे. तर, पतीला ताब्यात घेतल्यावर त्या महिलेला कधी व कशी बांधण्यात आली हे उलगडणार आहे.

US Woman Sindhudurg
US Woman Sindhudurg: भयंकर! कोकणातील जंगलात अमेरिकन महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत सापडली; ४० दिवस अन्नपाण्याविना विना..

अमेरिकन दुतावासाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची संयुक्त पथके अधिक तपासासाठी गोवा व तामिळनाडू येथे गेली आहेत. तामिळनाडू येथे तपासासाठी गेलेल्या पथकाला काही महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याने बांदा पोलिसात सोमवारी रात्री उशिरा मुख्य संशयिताविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. पोलीस गुप्त पद्धतीने या प्रकरणाचा तपास करत असून अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.