Lanja Police Station
Lanja Police Stationesakal

Lanja Police : पपईच्या झाडाचे माकडाने नुकसान केले म्हणून विवाहितेचा छळ; सासूविरुद्ध गुन्हा दाखल

दीपिका दिनेश चापडे हिचे ९ मे २०२३ ला पुनस कडूवाडी येथील दिनेश गजानन चापडे याच्याबरोबर लग्न झाले होते.
Published on
Summary

या प्रकरणी तिने लांजा पोलिस ठाण्यात सासू अनिता चापडे हिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

लांजा : विवाहितेने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सासूविरोधात लांजा पोलिस ठाण्यात (Lanja Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील पुनस कडूवाडी येथे १६ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका दिनेश चापडे (वय २२) हिचे ९ मे २०२३ ला पुनस कडूवाडी येथील दिनेश गजानन चापडे याच्याबरोबर लग्न झाले होते; मात्र लग्नानंतर काही दिवसातच सासू अनिता गजानन चापडे (वय ६०) हिने तिला त्रास देण्यास सुरवात केली होती.

Lanja Police Station
Raju Shetti : हसन मुश्रीफांचं 'ते' चॅलेंज राजू शेट्टींनी स्वीकारलं; म्हणाले, मी पुराव्यानिशी ते जाहीर करणार..

१६ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर या कालावधीत सासू अनिता चापडे हिने त्यांना क्रूर वागणूक देण्यास सुरवात केली होती. पपईच्या झाडाचे माकडाने नुकसान केले म्हणून तिला शिवीगाळ करत कोयती हातात घेऊन तिच्या अंगावर धावून जात तिला धमकी दिली होती. हा मानसिक त्रास असह्य झाल्याने सून दीपिका चापडे यांनी ६ नोव्हेंबर २०२३ ला सायंकाळी गवत मारण्याचे औषध घेऊन त्यात मुंग्यांची पावडर टाकून प्राशन केले होते.

Lanja Police Station
Whale Fish : रत्नागिरीत व्हेल माशाची तब्बल 2.75 कोटींची उलटी जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सिंधुदुर्गातील चौघांना अटक

त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी तिने लांजा पोलिस ठाण्यात सासू अनिता चापडे हिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मंगळवारी (ता. ७) नोव्हेंबरला तिच्यावर लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.