US Woman Sindhudurg: भयंकर! कोकणातील जंगलात अमेरिकन महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत सापडली; ४० दिवस अन्नपाण्याविना विना..

Chained Woman found in konkan Jungle: काही गुराख्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर डोंगरावरून तिला खाली आणत उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले.
Sawantwadi Forest
Sawantwadi Forestesakal
Updated on
Summary

ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याचे समजते. उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंद्याला लॉक करण्यात आले होते.

सावंतवाडी : सोनुर्ली आणि रोणापाल या गावांच्या सीमेवरील दाट जंगलात (Forest) आज एक महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडालीये. ही महिला गेली तीन दिवस या जंगलात बांधलेल्या अवस्थेत होती. US Woman Sindhudurg

काही गुराख्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर डोंगरावरून तिला खाली आणत उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. हा प्रकार तिच्या नवर्‍याने केल्याचा संशय आहे. संबंधित महिलेचे नाव ललिता कायी कुमार एस असे असून ती तामिळनाडूमधील (Tamil Nadu) रहिवासी आहे.

Sawantwadi Forest
Sawantwadi Forest
Sawantwadi Forest
'आरक्षणाची 50 टक्के मर्यादा काढून टाका'; राजर्षी शाहू महाराजांच्या आदेशाचा दाखला देत राहुल गांधींची मागणी

ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याचे समजते. उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंद्याला लॉक करण्यात आले होते. बाजूला पाण्याची बाटली, पिशवी ठेवली होती. हे ठिकाण मडुरा रेल्वेस्थानकापासून जवळ असल्याने रेल्वेतून आणून संबंधित महिलेला या जंगलात आणत बांधून ठेवल्याचा अंदाज आहे. (US National Found Chained in Sindhudurg Jungle Maharashtra)

Sawantwadi Forest
Sawantwadi Forest

मुसळधार पाऊस आणि सलग तीन दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. आज त्या भागात सोनुर्लीतील काहीजण गुरे चारण्यासाठी गेले असता आवाज आला. त्यांनी जवळ जावून पाहिल्यावर हा गंभीर प्रकार पुढे आला. पोलिसांना कळवल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. तिला साखळदंडातून सोडवत तेथीलच लाकडांची डोली करून खाली आणण्यात आले. घटनास्थळी संबंधित महिलेचे आधारकार्ड मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.