Nilesh Rane : माजी खासदार नीलेश राणेंसह 24 जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल; पोलिसांचा आक्रमक पवित्रा

Nilesh Rane : मिरजोळे एमआयडीसी येथे गोवंश हत्येतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा काढून रास्ता रोको करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली.
Nilesh Rane Ratnagiri Police
Nilesh Rane Ratnagiri Policeesakal
Updated on
Summary

मोर्चा काढून रास्ता रोको केल्याबद्दल पोलिसांनी नीलेश राणे, बाळ माने, सचिन वहाळकर, चंद्रकांत राऊळ यांसह सकल हिंदू समाज संघटनेच्या इतर २४ जणांवर गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

रत्नागिरी : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी (Ratnagiri Police) माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह २४ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे गोवंश हत्येतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी ७ जुलैला नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली परवानगी न घेता मोर्चा काढून रास्ता रोको केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.