Alphonso Mango : हापूस आंब्याच्या नावाने ग्राहकांची मोठी फसवणूक; कसं फसवलं जातं ग्राहकांना? जाणून घ्या..

सध्या हापूसला चढादर असताना ग्राहकांकडून मागणी अधिक आहे.
Alphonso Mango
Alphonso Mangoesakal
Updated on
Summary

कोकणातील हापूस आंब्यांच्या (Alphonso Mango) सरासरी ३५ ते ४० हजार पेट्या दररोज बाजार समितीत येत आहेत.

तुर्भे : वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Mumbai Krushi Utpanna Bazar Samiti) आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात दाखल झाला असताना काही व्यापाऱ्यांकडून इतर जातीच्या आंब्यांची हापूसच्या नावाने विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी बाजार समितीने अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कोकणातील हापूस आंब्यांच्या (Alphonso Mango) सरासरी ३५ ते ४० हजार पेट्या दररोज बाजार समितीत येत आहेत. तर अन्य राज्यातून आंब्याच्या १० ते १२ हजार पेट्या येत आहेत. सध्या हापूसला चढादर असताना ग्राहकांकडून मागणी अधिक आहे.

Alphonso Mango
ज्या महामानवानं भारताला संविधान दिलं, त्याच आंबेडकरांना दोन वेळा काँग्रेसकडून स्वीकारावा लागला पराभव!

अशातच काही व्यापाऱ्यांकडून हापूसच्या पेटीच्या आड इतर जातीचे आंबे विकले जात आहेत. मुंबईतून एपीएमसीत आंबे खरेदीसाठी आलेले उद्धव भामरे यांनादेखील पेटीत हापूस आंबे असल्याचे सांगत हलक्या दर्जाचेच आंबे विकले गेले होते. ही बाब लक्षात येताच त्यांनी आंबे खरेदी केलेल्या व्यापाऱ्याकडे पैसे परत मागितले.

मात्र, संबंधित व्यापाऱ्याने नकार दिल्याने अखेर अन्न औषध प्रशासनातच कामाला असल्याचे सांगितल्यावर त्यांना पैसे परत मिळाले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणूक होत असल्याने बाजार समितीने अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Alphonso Mango
Navekhed Village : वाळवा तालुक्यातील नवेखेड गावाने जिद्द, कष्टाने केला अनोखा प्रवास; काय आहे खासियत?

अशी होते फसवणूक

चार डझनच्या आंब्याच्या पेटीमध्ये पहिल्या थरावर हापूस ठेवला जातो. त्यानंतर खालच्या थरांमध्ये इतर जातीचे तसेच अपरिपक्व असलेले आंबे भरले जातात. एकदा का पेटी घरी गेली की सहसा कोणी आंबे परत घेण्यासाठी येत नाही. ग्राहकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेत एपीएमसीतील काही व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.