''आज जी घटना घडली आहे, ती सर्वच शिवप्रेमींना वेदना देणारी आहे. सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड झाली, ती जनभावना आहे.''
मालवण : राजकोट येथे घडलेली घटना सर्वच शिवप्रेमींना वेदना देणारी आहे. शिवछत्रपतींचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Collapse Statue) उभारणाऱ्या शिल्पकारासह कन्सल्टंट यांनी आवश्यक काळजी घेतली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली.