शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, तर पाटलांची सावंतवाडी कारागृहात रवानगी

Sculptor Jaydeep Apte : राजकोट किल्ला (Rajkot Fort) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती.
 Jaideep Apte Police Custody
Jaideep Apte Police Custodyesakal
Updated on
Summary

''राजकोट किल्ला येथील पुतळा कोसळल्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची पूर्ण चौकशी झालेली नाही.''

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatrapati Shivaji Maharaj Collapse Statue) गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे (Jaydeep Apte) व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील (Dr. Chetan Patil) यांना आज दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यात आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.