बांधकाम विभागाकडून बोगस कामे होत असल्याचा आरोप करत आमदार वैभव नाईक यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी कार्यालयाची तोडफोड करत तीव्र निषेध केला.
मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj Collapsed Statue) तीव्र पडसाद शहरात उमटले. आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) कार्यालयात धडक देत तोडफोड करत निषेध केला.