चिपळूण : रासायनिक खतांच्या किमतीत दोन महिन्यांत तब्बल शंभर ते अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या गळचेपी करणारी आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी रासायनिक खतांच्या दरवाढीबाबत केंद्र शासनाकडे आवाज उठवावा, झालेली दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. खरिपाच्या हंगामात चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे; मात्र खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी नाराज झाला आहे.
चिपळूण तालुक्यात मागणीप्रमाणे खत उपलब्ध झालेले नाही. सुरुवातीपासूनच ही ओरड असताना टप्प्याटप्प्याने खतांचा पुरवठा सुरू आहे; मात्र आता बाजारात खताची किंमत वाढल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे.
मागील दोन दिवस पावसाने चांगली उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पिकांना खते देण्याची कामे सुरू केली आहेत. खते घेताना सर्वच रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या आढळून आल्या. त्यातच केंद्र शासनातर्फे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली.
महागाईचा चढता आलेख
सुपर फॉस्फेटची एक बॅग जून महिन्यात ५०० रूपयाला मिळत होती. ती जुलै महिन्यात ६०० रूपयावर गेली. १०ः२०ः२० हे खत गतवर्षी १२५० रुपयांना मिळत होते. ते यंदा १४७० ला मिळत आहे. पोटॅश एक हजार रुपयांना मिळत होते, ते १७०० ला मिळत आहे. १५ः१५ः१५ खत ११५० ला मिळत होते, ते आता १४७० ला मिळत आहे.
ग्राफ करावा दरावर एक नजर..
सुपर फॉस्फेटची बॅगः ६०० रूपये
१०ः२०ः२० खतः १४७० रूपये
पोटॅशः १७०० रूपये
१५ः१५ः१५ खतः १४७० रूपये
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.