नेत्यांनो, यायचे असल्यास हाती झाडू घेऊन या नाहीतर....

चिपळूणकरांना उपद्रव; यंत्रणेवर ताण, अडथळेच
नेत्यांनो, यायचे असल्यास हाती झाडू घेऊन या नाहीतर....
Updated on

चिपळूण : चिपळूणमधील महापुरानंतरची स्थिती आणि महापुराने केलेल्या जखमा आता पूर्णपणे उघड होत आहेत. भविष्यासाठी काय करायला पाहिजे, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र १५ दिवसांत मंत्री आणि नेत्यांच्या दौऱ्यांनी चिपळूणकरांना दिलासा मिळण्याऐवजी त्यांचा उपद्रवच झाला आहे. मंत्र्यांच्या गाड्या, ताफे, फुकाचे कार्यकर्ते यांची गर्दी ही मदत कार्यात, स्वच्छतेत अडथळाच ठरली.

स्वच्छता हवी म्हणून व्यापाऱ्यांनी आपणहून तीन दिवस दुकाने बंद ठेवली. मात्र नेत्यांना ही जाणीव झाली नाही. जनजीवन सुरळित होत असताना नेत्यांनी, मंत्र्यांनी दौरे थांबवावेत आणि यायचेच असेल तर जेथे सफाई आवश्यक आहे, तेथे हाती झाडू घेऊन यावे, अशी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे. यापुढे चिपळूणची पूरपरिस्थिती पाहण्यासाठी येणाऱ्या मंत्री, बडे नेते, आमदार, खासदार आणि सेलिब्रेटींनी नुसते दौरे करून लोकांचा आणि यंत्रणेचा ताप वाढविण्याऐवजी स्वतः हातात झाडू घेऊन किमान दोन, चार घरे साफ करून द्यावीत. तसेच आपल्या मागे-पुढे फिरणाऱ्यांनाही दोन तास श्रमदान करायला सांगावे.

नेत्यांनो, यायचे असल्यास हाती झाडू घेऊन या नाहीतर....
7 महिन्याच कष्ट 7 दिवसांत मातीमोल; सोयाबीन कुजले, पिक वाहून गेले

सरकारी खर्चाने म्हणजेच लोकांच्या पैशावर फुकटचे आणि वांझोटे दौरे करू नयेत. गेल्या दहा दिवसांत इतके मंत्री आले, नेते आले काय उपयोग झाला असा संतप्त सवाल चिपळूणकर करत आहेत. पाचपन्नास गाड्यांचा ताफा फिरवून वाहतूक कोंडी करायची, सगळे लहान-मोठे अधिकारी, कर्मचारी आणि विशेषकरून पोलिस यंत्रणेला कारण नसताना तासनतास गुंतवून ठेवायचे ही कुठली पद्धत? असले दौरे म्हणजे अडचणीत असलेल्या नागरिकांना आणखी वेठीस धरण्याचा प्रकार आहे. या दौऱ्यांमुळे सुरू असलेल्या मदतकार्यात अडथळाच येतो. यायचंच असेल तर छान छान उंची पोशाखात न येता हातात झाडू घेण्याची तयारी ठेवून या. दोन तास श्रमदान करा तर तुम्ही खरे मंत्री आणि नेते.

स्वतःच्या कपड्यांवर साधा एखादा डाग पडणार नाही, याची काळजी घेत कसले दौरे करता? असे मंत्री, नेते म्हणजे नवीन संस्थानिकच म्हटले पाहिजेत. त्यांनी लोकांसह सर्व यंत्रणाच दावणीला बांधली आहे, याकडे येथील जनतेने लक्ष वेधले. निदान आपत्तीकाळात स्थानिक पालकमंत्री, आमदार, खासदार, महसूल, पोलिस प्रशासन यांना पूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकार देऊन योग्य ती मदत केली जाऊ शकते. उगाच बिनकामाचे दौरे करून काहीही होणार नाही. आजपर्यंतचा अनुभव तरी वाईटच आहे.

नेत्यांनो, यायचे असल्यास हाती झाडू घेऊन या नाहीतर....
'हिंदूमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतंय' - नितेश राणे

"चिपळुणात मगरी भरपूर आहेत. त्यांचे अश्रूही खरे आहेत. पण मंत्री, बडे नेते यांचे अश्रू मगरीचे ठरू नयेत. वांझोटे दौरे आणि बैठका करण्यापेक्षा आहात तिकडेच थांबा आणि अश्रू खरे असतील तर तिथून तत्काळ निर्णय घ्या, मदत करा. यांच्या दौऱ्यांचाच खर्च इतका आहे की, त्यात शंभर कुटुंबांचे पुनर्वसन होईल."

- मकरंद भागवत, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.