Chiplun Rain : वाशिष्ठी नदीच्या नव्या पुलाचा भराव गेला वाहून; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम?

२२ जुलै २०२१ मध्ये झालेल्या महापुरात जुन्या वाशिष्ठी पुलाच्या मध्यवर्ती भागातील भराव वाहून गेला होता.
Chiplun Rain Update
Chiplun Rain Updateesakal
Updated on
Summary

वाशिष्ठी पुलावर दोन्ही बाजूस जोडरस्त्याचे काँक्रिटीकरण झालेले नाही. त्यामुळे पुलास असलेल्या जोडरस्त्याचा काही भाग खचून तो वाहून गेला. तेथे तातडीने ठेकेदार कंपनीने दुरुस्ती केली आहे.

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (Mumbai-Goa National Highway) चौपदरीकरणात नव्याने उभारण्यात आलेल्या वाशिष्ठी नदीवरील (Vashishti River) पुलाच्या जोडरस्त्याचा काही भाग बुधवारी (ता. १९) झालेल्या पावसात वाहून गेला. कळबंस्तेकडील भागात हा प्रकार घडला असून, ठेकेदार कंपनीने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

येथे २२ जुलै २०२१ मध्ये झालेल्या महापुरात जुन्या वाशिष्ठी पुलाच्या मध्यवर्ती भागातील भराव वाहून गेला होता. अतिवृष्टी सुरू असतानाच त्या ठिकाणी भराव करताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली होती. या घटनेनंतर नवीन वाशिष्ठी पुलाचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले.

Chiplun Rain Update
Devendra Fadnavis : इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत फडणवीसांनी दिली महत्वाची अपडेट; गृहमंत्री अमित शहाही घटनेवर लक्ष ठेवून

अत्यंत घाईघाईत या पुलाचे काम पूर्ण करून आधी एकेरी मार्ग व त्यानंतर दुहेरी मार्गावरून वाहतूक सुरू केली; मात्र त्यानंतर या पुलाकडे दुर्लक्ष झाले. विशेषतः पुलाच्या जोडरस्त्याचे काम काही अंशी अपूर्ण होते. ज्या ठिकाणी जोडरस्ता पुलाला जोडला जातो त्याच ठिकाणी आरसीसी भिंतींचे काम शिल्लक आहे.

त्यामुळे त्या ठिकाणी केलेला भराव वाहून जाण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती. अशातच बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात हा भराव वाहून गेला. त्यामुळे जोडरस्त्याचा काही भाग धोकादाक बनला. या घटनेची राष्ट्रीय महामार्ग विभागाने तत्काळ दखल घेत पाहणी केली. त्यानंतर भराव व अन्य दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला दिल्या.

Chiplun Rain Update
Transport Board : आता स्वस्तात मस्त पाहा धबधबे; परिवहन मंडळानं जारी केली पॅकेज टूर, 'हे' धबधबे पाहता येणार

त्याप्रमाणे गुरुवारी (ता. २०) सकाळी ठेकेदार कंपनीने त्याजागी पुन्हा भराव केला. तसेच आरसीसी भिंतीचे काम तातडीने केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पुलाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा ठेकेदार कंपनीकडून देण्यात आला आहे. येथील भराव खचला तरी दुसऱ्या पुलावरून वाहतूक नियमित सुरू ठेवण्यात आली होती. हा भराव पुन्हा वाहून जाऊ नये यासाठी आरसीसी भिंतीचे काम तातडीने केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

Chiplun Rain Update
Mumbai Rain: मुसळधार पावसाचा आझाद मैदानावरील आंदोलकांना मोठा फटका; मागण्या पूर्ण होण्यापूर्वीच गुंडाळावं लागलं आंदोलन

वाशिष्ठी पुलावर दोन्ही बाजूस जोडरस्त्याचे काँक्रिटीकरण झालेले नाही. त्यामुळे पुलास असलेल्या जोडरस्त्याचा काही भाग खचून तो वाहून गेला. तेथे तातडीने ठेकेदार कंपनीने दुरुस्ती केली आहे. नवीन वाशिष्ठी पुलास कोणत्याही प्रकारचा धोका नाही. येथील वाहतूकदेखील नियमित आणि सुरक्षितपणे सुरू आहे. परशुराम घाटाबाबतही आम्ही दक्षता बाळगून आहोत.

-श्याम खुणेकर, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.