चिपळूण : आठवडा बाजार फोफावला शहरभर

लांजा शहराचे दुखणे; अनेक समस्या निर्माण, नगरपंचायतीचे दुर्लक्ष
market
marketsakal
Updated on

लांजा: दर मंगळवारी भरणाऱ्या लांजा तालुक्याच्या आठवडा बाजारावर कसल्याही प्रकारची बंधने व मर्यादा नसल्याने तो शहरभर फोफावला आहे. महामार्गाच्या दुतर्फा हा आठवडा बाजार भरत असल्याने अनेक समस्या यामुळे निर्माण होत आहेत. नगरपंचायतीने आजवर महामार्गाच्या दुतर्फा भरणाऱ्या या बाजारावर कोणतेच नियंत्रण ठेवले नव्हते. आता योग्य ती उपाययोजना ही काळाची गरज बनली आहे. शहरात भरणाऱ्या या तालुक्याच्या आठवडा बाजारला कायम स्वरूपाची सुरक्षित जागा देऊन आठवडा बाजाराचे पर्यायी व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाने आठवडा बाजार विस्थापित होणार आहे. म्हणूनच यावर कायमचा पर्याय आवश्यक आहे.

लांजा तालुक्याचा आठवडा बाजार दर मंगळवारी लांजा शहरात भरतो. सर्वाधिक ग्राहकांच्या गर्दीचा बाजार म्हणून याला त्याच्या आठवडा बाजाराची विशेष ओळख आहे. महामार्गाशेजारी दुतर्फा बाजार भरल्याने निर्माण होणाऱ्या समस्या दूरगामी परिणाम करणाऱ्या असून त्या वाढत्या शहरीकरणाला बाधक ठरणाऱ्या आहेत. दिवसेंदिवस या बाजाराची व्याप्ती व विस्तार वाढत आहे. या दिवशी लांजा शहरात वाहतूक कोंडी होते. महामार्गावरील वाहनांमुळे किरकोळ अपघातासह काहीवेळा भीषण अपघातांना सामोरे जावे लागले आहे.

आठवडा बाजारासाठी सुरवातीला अधिगृहित केलेली सुमारे दोन एकर जमीन तत्कालीन महामार्ग रुंदीकरणात गेली. त्यामुळे हा बाजार गेली अनेक वर्षे महामार्गाशेजारीच भरत आहे. सद्यःस्थितीत शहरात आठवडा बाजारासाठी जागाच उपलब्ध नसल्याची सर्वात गंभीर गोष्ट आहे. ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर तेव्हाच्या परिस्थितीत आठवडा बाजारासाठी ग्रामपंचायतीने आपल्या आवारातील मोकळी जागा उपलब्ध करून दिली होती; मात्र बदलत्या परिस्थितीनुसार वाढत्या लोकसंख्येचा जीवनमनात झालेल्या बदलांचा विचार करता आठवडा बाजाराच्या व्यापारातही कमालीचे स्थित्यंतर झाले.

वाढत्या लोकसंख्येमुळे बाजाराचा ग्राहकवर्ग पर्यायाने व्यापारीवर्ग वाढला. या बदलत्या काळाचा विचार नगरपंचायतीकडून कालपरत्वे होणे गरजेचे आहे; मात्र हा विचार न होता जैसे थे परिस्थिती आजतागायत राहिली आहे.

शहरात विस्तारात असलेल्या या आठवडा बाजारावर नियंत्रण वा कडक निर्बंध लावण्याचे काम होत नसल्याने एकूणच लांजा शहरीकरणाच्या वाढत्या प्रक्रियेतील नियोजनाचा अभाव यातून जाणवतो. म्हणूनच भविष्यात नगरपंचायतीने आठवडा बाजार संदर्भात ठोस पावले उचलून निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करायला हव्यात.

- संजय यादव, नगरसेवक, लांजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.