मुरूड-जंजिरा, काशीद बीच, दिवेआगर, आगरदांडा बीच दोन दिवसांपासून पर्यटकांनी गजबजले असून किनाऱ्यावर तुफान गर्दी लोटली आहे.
मुरूड - मुरूड-जंजिरा, काशीद बीच, दिवेआगर, आगरदांडा बीच दोन दिवसांपासून पर्यटकांनी गजबजले असून किनाऱ्यावर तुफान गर्दी लोटली आहे. वीकेण्ड असल्याने पुणे, सोलापूर, कोल्हापूर, फलटण, औरंगाबाद, जळगाव, धुळे, बार्शी आदी विविध भागातील शैक्षणिक सहली शनिवारी दुपारपासूनच दाखल झाल्या आहेत. वाढलेल्या थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून पर्यटक शेकोटीचा आनंद घेत आहेत. किनाऱ्यालगतचे हॉटेल, लॉजमध्ये बुकिंग फुल असल्याने व्यावसायिकही समाधान व्यक्त करीत आहेत.
किनाऱ्यावरील खाद्यपदार्थाच्या विविध स्टॉलवर रविवारी गर्दी झाली होती. स्पीडबोट, बनाना बोट, साहसी क्रीडा प्रकाराबरोबरच घोडागाडी, घोडेस्वारीचा पर्यटकांनी मनसोक्त आनंद घेतला. मार्गशीर्ष महिना संपल्याने खवय्यांनी मांसाहारावर ताव मारला. मुरूडच्या गोड्या व ताज्या माडीलाही विशेष पसंती मिळत आहे.
वाहनतळ फुल
मुरूड-अलिबाग मार्गावर रविवारी वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसले. त्यामुळे अनेक पर्यटक भालगाव व केळघरमार्गे शहरात दाखल होत होते. मुरूड समुद्रकिनारी वाळूवरील वाहनतळ दोन दिवसांपासून हाऊस फुल झाले आहे. त्यामुळे अनेक वाहने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दिसल्या. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांसह शैक्षणिक सहलींचा ओघ कायम आहे.
खाद्य महोत्सव
यंदा पर्यटन महोत्सवाचे आयोजन लांबणीवर पडले असले तरी मुरूड समुद्रकिनारी शाकाहारी-मांसाहारी खाद्य महोत्सव सुरू आहे. मुरूड तालुका महिला मंचतर्फे आनंदमेळा अर्थात खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध पदार्थांची लज्जत घेण्यासाठी खवय्ये घेत आहेत. याशिवाय अन्य ५० स्टॉल महोत्सवात असून पर्यटकांसह स्थानिक आवर्जून भेट देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.