पालकमंत्री म्हणतात.., 'आधी शिवसेनेत या, मगच तुमचं काम करू'

पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ना शिवसेनेची, ना राष्ट्रवादीची गरज आहे.
anil parab
anil parabesakal
Updated on
Summary

पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ना शिवसेनेची, ना राष्ट्रवादीची गरज आहे.

रत्नागिरी : विकासकामे घेऊन जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब (Anil Parab) हे दुजाभाव करीत आहेत. काम घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना आधी शिवसेनेत या, मगच तुमचे काम करू, असे पालकमंत्री सांगत आहेत. ही भूमिका त्यांनी बदलली पाहिजे. हे वागणे त्यांनी आता थांबवावे. रत्नागिरीतील (Ratnagiri) शिवसेनाच नव्हे, तर भारतीय जनता पक्षाचीही दादागिरी काँग्रेस कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत, असा इशारा काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला. त्यांना जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनीही दुजोरा देत पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. (congress leader bhanudas mali)

काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांना दाबून टाकण्याचे काम केले जाते. जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, म्हणजे त्यांनी कमजोर आहोत, असे समजू नये. अन्यथा, काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांत आम्ही हेच धोरण स्वीकारू शकतो, हे लक्षात घेऊन पालकमंत्री परब यांनी वागणे बदलावे, असा सल्ला त्यांनी दिला.

anil parab
'रश्मी ठाकरेंचे बंगले गेले कुठे? CBI चौकशीसाठी मोदींकडे विनंती करणार'

सध्या राज्यात काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. पक्षश्रेष्ठींनीही आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ना शिवसेनेची, ना राष्ट्रवादीची गरज. काँग्रेस जिल्ह्यात स्वतःची ताकद निर्माण करणार आहे, असे माळी यांनी सांगितले.

मत्स्य व्यवसाय मंत्र्यांची लवकरच बैठक

मच्छीमारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांच्याकडे बैठक झाली. त्यात पर्ससीननेटधारकांनी १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर जाऊन मासेमारी करण्याचा प्रश्‍न मांडला होता. त्यावर केंद्राकडून माहिती मागवण्यात आली आहे. मच्छीमारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लवकरच मंत्री शेख रत्नागिरीत येऊन बैठक घेणार आहेत, असे माळी यांनी सांगितले.

anil parab
राज्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव?, मंत्री सुनील केदार म्हणाले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.