Congress Taluka President Prashant Yadav
Congress Taluka President Prashant Yadavesakal

Maratha Reservation साठी कोकणातून पहिला राजीनामा; काँग्रेसच्या 'या' नेत्यानं पक्षाला दिली सोडचिठ्ठी

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषणाच्या माध्यमातून मोठा लढा उभारला आहे.
Published on
Summary

मराठा समाजाच्या आंदोलनाची धग यापुढील काळात वाढतच जाणार आहे.

चिपळूण : मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी राज्यभरात आंदोलने, मोर्चे आणि उपोषणेदेखील केली जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी यापुढे होणाऱ्या समाजाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी घेतला आहे.

समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करत असताना पक्षीय लेबल लागू नये यासाठी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सद्यःस्थितीत कोकणातील हा राजकीय पदाचा पहिला राजीनामा ठरला आहे.

Congress Taluka President Prashant Yadav
Maratha Reservation : कुणबीच्या 20 हजार नोंदी शिंदे समितीला सापडण्याची शक्यता; 15 ते 20 लाख लोकांना होणार फायदा

शहरातील काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली. या वेळी शहराध्यक्ष लियाकत शाह, महिला तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, फैसल पिलपिले, राकेश दाते यांच्यासह पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या वेळी काँग्रेस तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे प्रशांत यादव यांनी जाहीर केले.

ते म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषणाच्या माध्यमातून मोठा लढा उभारला आहे. राज्यभरात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. चिपळूण तालुक्यातही आता मराठा समाजबांधव आरक्षणासाठी संघटित होऊ लागला आहे. मराठा समाजाचे आपण घटक आहोत.

Congress Taluka President Prashant Yadav
'लवकरच काँग्रेसचं सरकार कोसळेल, उद्धव ठाकरेंसारखी अवस्था होईल'; भाजप आमदाराच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' प्रत्युत्तर

समाजाच्या आंदोलनात व्यासपीठावर असताना पक्षाला त्याचा त्रास होऊ नये यासाठी आपण केवळ तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.’ दरम्यान, यादव यांचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी यादवांचा राजीनामा मंजूर करतात की काही दिवस वेट अॅण्ड वॉंचची भूमिका घेतात याकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे.

Congress Taluka President Prashant Yadav
Maratha Reservation : 'महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, न्याय हक्काच्या लढाईत आवाज दडपू देणार नाही'; शिवेंद्रराजेंची रोखठोक भूमिका

पक्षालाही त्रास होऊ नये

मराठा समाजाच्या आंदोलनाची धग यापुढील काळात वाढतच जाणार आहे. मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्या वेळी राजकीय पदावरून टीकाटिप्पणी होऊ नये तसेच काँग्रेस पक्षालाही त्याचा त्रास होऊ नये. काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला सोबत घेऊन वाटचाल करणारा पक्ष आहे. सध्याच्या स्थितीला मराठा समाजाच्या चळवळीत आपण आक्रमकपणे सक्रिय राहणार आहोत. तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरी पक्षाचे काम करत राहणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.