'महाधनेश'च्या 39 जोड्यांचे संगमेश्वरसह चार तालुक्यांत संवर्धन; पक्षाच्या घरट्यांवरही राहणार CCTV ची नजर

चार तालुक्यांतील तीन प्रजातींच्या ३९ महाधनेशच्या जोड्यांचे संवर्धन करण्यात यश आले आहे.
Indian Great Hornbill Bird
Indian Great Hornbill Birdesakal
Updated on
Summary

सदाहरित आणि फायकस प्रजातीतील झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे महाधनेश या प्रजातीवर परिणाम झाला आहे.

रत्नागिरी : सह्याद्री संकल्प सोसायटी आणि सृष्टीज्ञान संस्था यांच्या संयुक्तपणे संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या चार तालुक्यांतील तीन प्रजातींच्या ३९ महाधनेशच्या जोड्यांचे संवर्धन करण्यात यश आले आहे. महाधनेशची (Indian Great Hornbill) घरटे असलेली झाडे दत्तक घेतली जातात. संबंधित शेतकऱ्‍याला झाडाचा मोबदला दिला जातो. त्या घरट्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा किंवा नेस्टवॉचर्सचे लक्ष असते.

महाधनेश, मलबार धनेश, राखाडी धनेश आणि मलबार राखाडी धनेश या चार प्रजातींचे पक्षी कोकणात सर्वाधिक आढळतात. त्यापैकी महाधनेश ही प्रजाती सध्या कमी होत असल्याचे पक्षीमित्रांच्या लक्षात आले आहे. त्यांचे संवर्धन करण्यासाठी आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सह्याद्री संकल्प सोसायटी आणि सृष्टीज्ञान यांनी संयुक्तपणे विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

Indian Great Hornbill Bird
बेळगाव सीमाप्रश्‍नाचा तिढा सुटणार? महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात मांडणार भक्कमपणे बाजू; मुंबईतील बैठकीत निर्णय

या टीममध्ये आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रताप नाईकवाडे, सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रतीक मोरे, डॉ. शार्दुल केळकर, कुणाल आणेराव आणि सृष्टीज्ञानचे प्रशांत शिंदे, संगीता खरात, अभिजित पाटील हे काम करत आहेत. त्यांनी चार तालुक्यांतील धनेश पक्ष्याची घरटी शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यांना आतापर्यंत ३९ जोड्या असलेली घरटी सापडली आहेत. त्यात मलबारी महाधनेशच्या २५, महाधनेशच्या १० तर ग्रे हॉर्नबिलची ४ घरटी आढळली.

Indian Great Hornbill Bird
वारणा उद्‍भव योजना गुंडाळली? प्रशासनाकडून ठोस कार्यवाही नाहीच; माहिती अधिकारातील उत्तरातून वास्तव आलं समोर

ती घरटी असलेली झाडे संबंधित शेतकऱ्‍यांकडून कराराने किंवा विकत घेतली आहे. त्यासाठी अनेकांनी देणगी उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन व्हावे आणि त्यांची पिल्ले बिबट्या किंवा कांडेचोराचे भक्ष्य बनू नयेत यासाठी २४ वॉच ठेवण्यात येतो. ज्या परिसरात नेटवर्क आहे तिथे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. नेटवर्क नसलेल्या ठिकाणी नेस्टवॉचर्स नेमण्यात आले आहेत. आतापर्यंत सहा नेस्टवॉचर्स मदत करत आहेत. आतापर्यंत ३९ जोड्यांचे संवर्धन करण्यात पक्षीमित्रांना यश आले आहे.

महाधनेश पक्ष्याच्या संवर्धनासाठी (Mahadhanesh Bird Conservation) चार तालुक्यांत मोहीम राबवली जात आहे. त्याला यश मिळाले असून, भविष्यात जिल्ह्याच्या उर्वरित भागातही धनेशची घरटी शोधण्यात येणार आहेत. धनेशचे संरक्षण व त्यांच्यासाठी आवश्यक वृक्षांची लागवड यावर लक्ष केंद्रित केले आहे.

-प्रतीक मोरे, देवरूख

Indian Great Hornbill Bird
पोलिस अधिकाऱ्यांबाबत रश्मी शुक्लांनी घेतला महत्त्वाचा निर्णय; अधिकाऱ्यांच्या मिरवणुका, फेटे बांधणे, पुष्पवृष्टीवर येणार बंधने

धनेशला उपयुक्त रोपांची लागवड

सदाहरित आणि फायकस प्रजातीतील झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे महाधनेश या प्रजातीवर परिणाम झाला आहे. या पक्ष्याचा पूर्ण जीवनक्रम फळांवर अवलंबून असतो. त्या पक्ष्याला ज्या झाडांची फळे मिळतात ती झाडे कमी झाली. फळांच्या शोधात महाधनेशाला भ्रमंती करावी लागते, हे घरट्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या निरीक्षणातून दिसून आले आहे. मिलनकाळात मादी घरट्याबाहेर जात नाहीत. त्यामुळे महाधनेश या पक्ष्याला तिच्यासाठी फळं आणावी लागतात. महाधनेश पक्ष्याला फळे मिळत नसल्याने पक्ष्यांची उपासमार होते. त्यांच्या संवर्धनासाठी महाधनेश पक्ष्याच्या विष्ठेतील मिळणाऱ्‍या बियांपासून रोपनिर्मितीचा राज्यातील पहिला प्रयोग हाती घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.