सैन्यदलातील अधिकारी पदांसाठी
नाशिकमध्ये १० जूनपासून कोर्स

सैन्यदलातील अधिकारी पदांसाठी नाशिकमध्ये १० जूनपासून कोर्स

Published on

सैन्यदलातील अधिकारी पदांसाठी
नाशिकमध्ये १० जूनपासून कोर्स

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ ः भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी १० जून ते २३ ऑगस्ट या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६३ आयोजित करण्यात आलेला आहे. हे प्रशिक्षण नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात होणार आहे.
शासनातर्फे नवयुवक व नवयुवतीसाठी कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ५ जुनला मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील सीडीएस ६३ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत १) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. २) उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी: training.petenashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक किंवा व्हाट्सॲप क्रमांकावर (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गमार्फत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.