गणपतीपुळेत फतवा; पर्यटकांना थारा दिल्यास 10 हजार दंड

beach of ganpatipule protect for tourist 50 people for last year in ratnagiri
beach of ganpatipule protect for tourist 50 people for last year in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध कायम असले तरीही गणपतीपुळेत परजिल्ह्यातून येणाऱ्‍यांचा राबता सुरू झाला आहे. कोरोना नियंत्रणासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीनेही कठोर पावले उचलत बाहेरील पर्यटकांना निवासस्थान भाड्याने दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र यावरून लॉज व्यावसायिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. covid-impact-10000-fine-for-shelter-to-tourists-action-in-ganpatipule-gram-panchayat-kokan-news

कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात ग्राम कृतिदल कार्यरत झाली आहेत. ही दले चांगल्या पद्धतीने कामही करत आहेत. गणपतीपुळे ग्रामपंचायतीने बाहेरून येणाऱ्‍या लोकांना राहण्यासाठी निवास दिल्यास लॉजिंग व्यावसायिकांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लॉजिंग व्यावसायिकांना नोटीसही दिली आहे. याबाबत काही व्यावसायिकांनी समविचारी मंचाकडे संपर्क साधून नाराजी व्यक्त केली.

एवढ्या मोठ्या रकमेचा दंड आकारण्याचा अधिकार ग्रामपंचायत, ग्राम कृतिदलाला आहे का? असा प्रश्‍न महाराष्ट्र समविचारी मंचच्या पदाधिकाऱ्‍यांनी उपस्थित केला आहे. तेथील व्यावसायिक स्थानिक रहिवासी आहेत. अनेकदा पर्यटक येतात. रात्री-अपरात्री आलेले पर्यटक निवासासाठी गयावया करतात. मग नाइलाजास्तव त्या बाहेरील व्यक्तींसाठी निवास व्यवस्था करावी लागते. त्यातील कोणताही व्यावसायिक पर्यटक यावेत, म्हणून प्रयत्न करीत नाही किंवा जाहिराती देत नाही.

दंडात्मक कारवाईचे शासकीय निर्देश काय ?

कोरोनाचे कडक निर्बंध पालन करण्यात गणपतीपुळे अग्रेसर आहे. दंडात्मक कारवाईचे शासकीय निर्देश काय आहेत, किती दंड आकारणी करावी, याविषयी सविस्तर माहिती घेऊन ग्रामपंचायतीच्या धोरणावर दाद मागण्याची भूमिका समविचारी मंचने घेतल्याची माहिती बाबा ढोल्ये आणि राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी दिली.

प्रादुर्भाव टाळण्यासाठी दंडात्मक कारवाई

याबाबत गणपतीपुळे उपसरपंच महेश केदारी म्हणाले की, गणपतीपुळेत परजिल्ह्यातून काही पर्यटक नेहमीच येत आहेत. नेवरे आणि मालगुंड या गावातही कोरोनाचे बाधित वाढलेले आहेत. आतापर्यंत गणपतीपुळेमध्ये नियंत्रण ठेवण्यात ग्राम कृतिदलाला यश आले आहे. या परिस्थितीत परजिल्ह्यातून येणाऱ्‍यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी दंडात्मक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. अजूनही कोणावर कारवाई केलेली नाही. कोरोनामुळे व्यावसायिकांची परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे. पर्यटनस्थळांबाबत प्रशासनाचे धोरण काय राहणार आहे, यावर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतीने मार्गदर्शन मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

एक नजर..

लॉजिंग व्यावसायिकांना दिली दंडाबाबत नोटीसही

नेवरे, मालगुंड या गावातही बाधित वाढले

गणपतीपुळेत नियंत्रण ठेवण्यात ग्राम कृतिदलाला यश

परजिल्ह्यातून येणाऱ्‍यांमुळे प्रादुर्भाव रोखणार

दंडात्मक कारवाईचा घेतला पवित्रा

पर्यटनस्थळांबाबत प्रशासनाचे धोरणाबाबत मार्गदर्शन मागवणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()