Ratnagir : गाळ्यात बसलेल्या गायीला मणका मोडेपर्यंत फावड्याने जबर मारहाण; कुवारबावमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त

पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
Ratnagiri Highway Police
Ratnagiri Highway Policeesakal
Updated on
Summary

गाळ्यात बसलेल्या गायीला रागाच्या भरात फावड्याने मारहाण केली.

रत्नागिरी : महामार्ग (Ratnagiri Highway) विस्तारीकरणात अर्धवट तोडलेल्या गाळ्यात बसलेल्या गायीला (Cow) फावड्याने मारून गंभीर जखमी केल्याच्या प्रकारावरून कुवारबाव येथे जमाव संतप्त झाला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Ratnagiri Highway Police
Kolhapur Crime : चाचणी परीक्षेचं टेन्शन? शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. गायीवर उपचार करण्यात आले. यानंतर घराला कुलूप लावून लपून बसलेल्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. जमावाला नियंत्रित आणण्यासाठी पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. हल्ला करण्यात आलेले फावडेही पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी, शहराजवळील कुवारबाव येथे रस्ता रुंदीकरणात गेलेल्या अर्धवट तोडलेल्या गाळ्यात एक गाय बसली होती. हे गाळे अनिल अर्जुन वाडकर (वय ४८, रा. कुवारबाव) यांच्या मालकीचे आहेत. त्यांनी दुपारी या गाळ्यात बसलेल्या गायीला रागाच्या भरात फावड्याने मारहाण केली. अतिशय निर्दयपणाने केलेल्या मारहाणीत गायीचा मणका मोडला आहे.

Ratnagiri Highway Police
OBC Reservation : ..तर ओबीसीतील 40 ते 45 जातींचं आरक्षण धोक्यात येऊ शकतं; मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं मोठं वक्तव्य

पोटावर गंभीर घाव आहेत. हा निष्ठूर प्रकार पाहिल्यानंतर मोठ्या संख्येने जमाव कुवारबाव बाजारपेठेत जमा होऊ लागला. याची माहिती पोलिसांना कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी, शहर निरीक्षक शैलेश सणस, सहाय्यक पोलिस निरीक्षक साळुंखे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले, तसेच एसआरपीचीचा एक प्लॅटून मागविण्यात आला.

Ratnagiri Highway Police
Shambhuraj Desai : पालकमंत्र्यांनी उरकले 'चटावरचे श्राद्ध'; आरोग्य सेवेबाबत शंभूराज देसाई कधी दाखवणार गांभीर्य?

प्राणी मित्रांनी यामध्ये पुढाकार घेऊन तत्काळ त्या गायीला उपचारासाठी एका गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. तिला उभे करण्याचा प्रयत्न केला.संशयित वाडकर याच्या कृत्याचा सर्वांनी निषेध केला. या प्रकरणी रोहन मयेकर यांनी तक्रार दिली असून शहर पोलिस ठाण्यात प्राण्याला निर्दय वागणूक या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी आणि शहर पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांनी दिली.

Ratnagiri Highway Police
मोठी बातमी! नितीन गडकरींचं प्रकरण ताजं असतानाच हिंडलगा कारागृहात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, बेळगावात खळबळ

फावड्यावर रक्ताचे डाग

पोलिसांनी संशयिताचा तपास सुरू केला, तर त्याच्या घराला एक नव्हे तर पाच कुलपे लावली होती. पोलिसांनी ही कुलपे तोडून संशयिताला ताब्यात घेतले. गायीवर वार केले ते फावडेही जप्त केले. संशयिताने ते धुवून ठेवले होते. परंतु त्यावर काही ठिकाणी रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.