Crime News
Crime Newssakal

Crime News: खवल्यांची तस्करीप्रकरणी दोघा आरोपींना वन कोठडी

Published on

Crime News: बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात दोघांना खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करून व्यवहार करत असताना ताब्यात घेण्यात आले होते. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली. यामध्ये न्यायालयाने हा वन गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याचे मत नोंदवले.

Crime News
Nandurbar Crime News : कुख्यात गुन्हेगार वर्षभरासाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार

ही कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल प्रमोद सावंत, प्रमोद राणे, वनरक्षक महादेव गेजगे, सागर भोजने, संग्राम पाटील यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Crime News
Dhule Crime News : सरपंचाचे निर्घृण खून प्रकरणी 14 आरोपींना जन्मठेप

न्यायालयात वन विभागाची बाजू सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी सक्षमपणे मांडली. आरोपीच्या बाजूने अॅड. परिमल नाईक यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. नारायण सावळाराम नाईक (वय ४८) व सद्गुरू मारुती नाईक (वय ५२) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन किलो वजनाच्या खवले मांजराची खवले व दुचाकी हस्तगत करण्यात आली. दोघांवर वन्यजीव संरक्षण अंतर्गत गुन्हा नोंद केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.