akola crime news illegal liquor shop stone pelting police marathi news
akola crime news illegal liquor shop stone pelting police marathi newsSakal

Crime News: कणकवलीत ४४ हजाराचा गुटखा जप्त, दोघांवर गुन्हे!

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Published on

अन्न व औषध प्रशासनाने आज कणकवलीत ४४ हजार ५९३ रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला, तंबाखू आणि गुटखा जप्त केला. कणकवली पटवर्धन चौक आणि बाजारपेठ येथील दोन पान शॉपवर सकाळी अकरा ते साडेअकरा या दरम्‍यान ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांना कणकवली शहरातील दोन पान शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्‍याचे व या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.

akola crime news illegal liquor shop stone pelting police marathi news
Crime News: गर्लफ्रेंडशी भांडण झालं म्हणून पोलिसाने उचललं टोकाचं पाऊल! प्रेयसीला मेसेज अन् फोटो पाठवून....

त्‍यानुसार साळुंखे यांनी सकाळी ११ वाजता पटवर्धन चौकातील प्रभाकर पान शॉप येथे छापा टाकला. यावेळी त्‍यांना प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि विविध प्रकारचा पान मसालायुक्‍त गुटखा आढळून आला.

या शॉपमध्ये एकूण १४ हजार ६६१ रुपयांचा गुटख्याचा साठा आढळला असून तो जप्त करण्यात आला. त्‍यानंतर दुपारी साडेअकरा वाजता बाजारपेठेतील स्वामीदत्त पानशॉपमध्येही साळुंखे यांनी छापा टाकला. यावेळी तेथील पानशॉपमध्ये २९ हजार ९३२ रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला, तंबाखू, गुटखा आढळून आला.

akola crime news illegal liquor shop stone pelting police marathi news
Jalgaon Crime News : अमळनेरला चोरट्‍यांनी 3 दुकाने फोडली

हा साठा जप्त करण्यात आला. पटवर्धन चौक येथील प्रभाकर पान शॉपमध्ये गुटखा बाळगणे आणि विक्री प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने या पान शॉपमधील तुषार मंगेश कोरगावकर (वय २८, रा. आशिये) यांच्यावर व बाजारपेठ येथील स्वामीदत्त पान शॉपमध्ये गुटखा बाळगणे आणि विक्रीप्रकरणी तेथील विजय दिगंबर कोरगावकर (वय ४८, रा. विद्यानगर) या दोघांवर गुन्हा नोंद केला असल्‍याची माहिती अन्न व सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्‍त मोहन किंबळकर यांनी दिली. या प्रकरणी संबंधितांवर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात आल्‍याचे ते म्‍हणाले.

akola crime news illegal liquor shop stone pelting police marathi news
Kokan Railway : कोकण रेल्वे होणार अधिक वेगवान; ‘वंदे भारत’ साडेसात तासांत मडगावात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.