cow
cowesakal

Crime: बेकायदा गुरांची वाहतूक करणारी पिकअप युवकांनी रोखली

Published on

Crime: बेकायदा गुरे वाहतूक प्रकरणी शहरात एक बोलेरो पिकअप ताब्यात घेण्यात आली आहे. या गाडीतून बेकायदा गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच शहरातील जागृत युवकांनी पाठलाग करून ही गाडी देऊळवाडा सागरी महामार्ग येथे अडवून याठिकाणी पोलिसांना पाचारण केले.

cow
Jalgaon Crime News : यावलला 3 घरफोड्या संशयित आरोपीस अटक

ही गुरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या गाडीवर यापूर्वी दोनवेळा गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे समजते.


तालुक्याच्या ग्रामीण भागातून एका टेम्पोमधून बेकायदा गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मालवणमधील तरुणांनी सापळा लावत हा टेम्पो गाठून त्याचा पाठलाग सुरू केला. अखेर देऊळवाडा सागरी महामार्ग येथे सकाळी हा टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता पूर्ण बंदिस्त केलेल्या या टेम्पोच्या आतमध्ये तीन गुरे दिसून आली. यामध्ये एक गाय, एक बैल आणि एक वासरू आढळले. या गाडीच्या चालकाकडे विचारणा केली

त्याच्याकडून विसंगत उत्तरे मिळाल्याने याठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर हा टेम्पो पोलिस ठाण्यात नेण्यात आला. यावेळी सीझर डिसोजा, ललित चव्हाण, अनिकेत फाटक, सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण, पंकज गावडे, पार्थ वाडकर, संदेश फाटक, शैलेश नामनाईक आदींचा समावेश होता. याबाबत मालवण पोलिस ठाण्यात पुढील कारवाई सुरू होती. ही गुरे बेळगाव मध्ये कत्तलीसाठी नेण्यात येत असून संबधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

cow
Nashik Fraud Crime: मालेगावच्या कर सल्लागाराला बनावट पावत्याप्रकरणी अटक; 86 कोटींचे बनावट इनव्हॉइस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.