Cyber Crimes
Cyber Crimesesakal

Cyber Crimes : तरुणांसाठी धोक्याची घंटा! Internet च्या अतिवापरामुळे सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ'

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कटिबद्ध राहण्याची गरज
Published on
Summary

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, इंटरनेटचा वापर करताना फसव्या संदेशांना अनेकजण बळी पडतात.

तळेरे (सिंधुदुर्ग) : आजकाल इंटरनेटच्या (Internet) वापरातून तरुणांचा ‘स्क्रीन टाईम’ वाढत असून, त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, असे प्रतिपादन ‘एमकेसीएल’चे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात आयोजित ‘सायबर सुरक्षा’ (Cyber Security) या विषयावरील कार्यक्रमात केले.

Cyber Crimes
Loksabha Election : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उतरणार लोकसभेच्या आखाड्यात; कोणत्या पक्षानं दिली उमेदवारी?

वामनराव महाडिक विद्यालय आणि दळवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली, श्रावणी कॉम्प्युटर्स तळेरे आणि जिल्हा पोलिस विभाग सायबर क्राईम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

श्रावणी कॉम्प्युटर्सचे संचालक सतीश मदभावे यांनी प्रास्ताविकात मोबाईल आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून ज्ञात-अज्ञात चुकींमुळे सायबर गुन्हे घडत असल्याचे प्रतिपादन केले. यातून अनेकांना आर्थिक, मानसिक फटके बसल्याची उदाहरणे त्यांनी सांगितली.

Cyber Crimes
Navratri Festival : बदामीनंतरचे मूळ देवीपीठ 'बनशंकरी'; मंदिराला तब्बल 200 वर्षांपूर्वीचा इतिहास, जंगलात सापडली देवीची मूर्ती!

यावेळी सर्व उपस्थितांना सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ श्रावणी मदभावी यांनी दिली. प्रज्ञा साळवी हिने मनोगत व्यक्त केले. प्रणाली मांजरेकर यांनी आभार मानले. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे ए.पी.आय. महेंद्र घाग, ए.पी.आय. सायबर पोलिस विकास बडवे, रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे, सायबर पोलिस नाईक सागर भोसले, पोलिस हवालदार किरण देसाई, पत्रकार उदय दुधवडकर, प्रा. हेमंत महाडिक, ह्यूमन राईट संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कासार्डे पोलिस चंद्रकांत झोरे आदी उपस्थित होते.

Cyber Crimes
Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू; खासदार मानेंची माहिती

फसव्या संदेशांना बळी पडू नका

पोलिस निरीक्षक यादव म्हणाले, ‘‘सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, इंटरनेटचा वापर करताना फसव्या संदेशांना अनेकजण बळी पडतात. यात काहींची रक्कम लुटली जाते, काही तरुणी, महिलांना व तरुणांनाही ब्लॅकमेल केले जाते. आमिष दाखवून किंवा धमकावून ड्रग्ज विक्रीसारखी कामे करून घेतली जातात; मात्र पोलिस यंत्रणा अशा गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे. यासाठी इंटरनेट वापरताना दक्ष राहा. कोणी आपल्याला फसवीत आहे किंवा अमिष दाखवीत असल्याचे वाटल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क करा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.