Cold Dapoli : दापोलीचा पारा पुन्हा आला खाली; तापमान ९.६ अं.से. अशी नोंद

दापोलीचा पारा पुन्हा एकदा खाली आला असून आजच्या २४ तारखेला किमान तापमान ९.६ अं.से. अशी नोंद झाल्याने पुन्हा एकदा संपूर्ण तालुक्यामध्ये जोरदार थंडीचं वातावरण तयार झाले आहे.
Cold Dapoli
Cold DapoliSakal
Updated on

हर्णै - दापोलीचा पारा पुन्हा एकदा खाली आला असून आजच्या २४ तारखेला किमान तापमान ९.६ अं.से. अशी नोंद झाल्याने पुन्हा एकदा संपूर्ण तालुक्यामध्ये जोरदार थंडीचं वातावरण तयार झाले आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर पुन्हा एकदा किमान तापमान ९.६ अं.से. अशी नोंद २४ जानेवारीला नोंद झाली आहे. राज्यात साधारणपणे ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीसच जिल्ह्यात थंडीला प्रारंभ होतो.

यंदा नोव्हेंबरमध्ये एक-दोन दिवसच थंडीची चाहूल लागली. मात्र त्यानंतर थंडी गायबच झाली होती. गेल्या दोन आठवड्यापूर्वी ढगाळ वातावरण होऊन अवकाळी पाऊस पडल्यानंतर थंडीची लाट सुरू झाली. तसेच उत्तरेकडून वाऱ्याच प्रमाण वाढल्यामुळे थंडीचं वाढत प्रमाण आहे. याच महिन्यात १६ जानेवारीला देखील ९.४ अं. से. अशी नोंद झाली होती.

दरम्यान, थंडीचं प्रमाण वाढत असल्याने वातावरणात कमालीचा गारवा वाढत आहे. त्यामुळे सर्दी, ताप,  खोकला आदी आजार जडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी १६ जानेवारी रोजी पारा सर्वात कमी म्हणजेच ९.४ अंशावर आला होता.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे हवामान केंद्रावर १६ तारखेला ९.४ नोंद झाल्यानंतर १७ -१ रोजी ११.९, १८-१, रोजी १२.१, १९-१ रोजी १०.७, २०-१ रोजी १३.५, २१-१ रोजी ११.५, २३- १ रोजी १०.२ गेल्या आठवड्यात अशी नोंद या महिन्यात झाली आहे. मंगळवारी सकाळपासून ते बुधवार सकाळ अश्या चोवीस तासातील ही आजची नोंद आहे.

गेले आठवडाभर पारा खालीवर होत असल्याने वातावरणातील संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे. दापोली शहरात व तालुक्यामध्ये वातावरणात अधिक गारवा वाढल्याने येथील ग्रामस्थ सकाळपासूनच गरम वस्त्र परिधान करू लागले आहेत. सकाळी व सायंकाळच्या वेळेस खेड्यापाड्यांमध्ये शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडगार वातावरणामुळे तालुक्यात आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे.

पुढे शुक्रवार पासून २६ जानेवारी, व सलग लागून आलेला शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण किनारपट्टी लगतची बहुतांशी रिसॉर्ट आधीच बुक झाले असल्याचे येथील रिसॉर्ट मालकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.