तब्बल 2 वर्षांनी दापोलीच्या 'त्या' डॉक्टरवर गुन्हा दाखल    

गुन्हा दाखल झाल्यामुळे पंकज कदमच्या नातेवाईकांना न्याय मिळाला आहे.
Fake doctor
Fake doctor sakal
Updated on

दाभोळ : दापोली तालुक्यातील टेटवली, मळेकरवाडी येथील सर्पदंश झालेल्या पंकज कदम या रुग्णावर दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दिरंगाई व निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दापोली उपजिल्हा रूग्णालायातील डॉ. बालाजी सगरे यांचे विरोधात दापोली पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने दापोलीतील आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.

२० ऑगस्ट २०१९ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पंकज कदम घरी झोपला असताना त्याच्या डोक्याला साप चावला होता. त्यामुळे उपचारासाठी त्याला दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर ड्युटीवरील परिचारिकांनी उपचाराला सुरुवात केली. मात्र तेव्हा ड्युटीवर असलेले डॉ. बालाजी सगरे हे परिचारिकांनी वारंवार फोन करूनही उपजिल्हा रुग्णालयात पंकज कदमला तपासणीसाठी आले नाहीत. पहाटेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांना एक प्रसूतीची सिरीअस केस असल्याने डॉ. सगरे यांना उपजिल्हा रुग्णालयात बोलावले. ४ वाजता आलेल्या डॉक्टरांनी पंकजला तपासले आणि अधिक उपचारासाठी दापोली येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले.

Fake doctor
चाकरमान्यांना मोठं गिफ्ट; गणेशोत्सवाला धावणार राणेंची 'मोदी एक्स्प्रेस'

यावेळी त्याला डेरवणातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र १० मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला. यावेळी मृत्यूस कारणीभूत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलनही केले होते. दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. चव्हाण, डॉ. कुणाल मेहता व डॉ. महेश भागवत यांनी पंकजचे पोस्टमार्टेम केले व व्हिसेरा राखून ठेवून मृत्युच्या कारणाचा अभिप्राय दिला नाही. या मृत्यच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी सगरे हे २१ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ४ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात आले नाहीत, तसेच त्यांनी प्रत्यक्ष रुग्ण तपासणी न करता केसपेपर लिहिल्याचे वाटते.

पंकज याचा मृत्यू सर्पदंशामुळे श्वासावरोध झाल्यामुळे झाला आहे. पंकजला उपचारासाठी दाखल केल्यावर अतितातडीची बाब म्हणून तत्काळ तपासणी केली असती, डॉ. बालाजी सगरे यांनी पंकजला न तपासताच केसपेपरवरील नोंदी केल्याचे समोर आले. सर्पदंशासारखा अतितातडीचा रुग्ण वेळीच न तपासणे हा निष्काळजीपणा असल्याचे असा स्पष्ट अहवाल दिला आहे. पंकजच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. बालाजी सगरे यांचे विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक निनाद पाटील करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यामुळे पंकज कदमच्या नातेवाईकांना न्याय मिळाला आहे.

Fake doctor
IT portal glitch : अर्थमंत्रालयाकडून इन्फोसिसच्या CEO ना समन्स

२१ ऑगस्ट २०१९ रोजी पंकज कदम याचा मृत्यू झाला व बरोबर २ वर्षांनी म्हणजे २१ ऑगस्ट २०२१ रोजी डॉ. बालाजी सगरे यांचेवर पंकजच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पंकजच्या मृत्यूमुळे डॉ. बालाजी सगरे यांची प्रथम सांगली  जिल्ह्यात डेप्युटेशनवर बदली करण्यात आली होती. सध्या ते उपजिल्हा रूग्णालय कळंबणी (ता. खेड) येथे कार्यरत आहेत, मात्र त्यांची मुळ नियुक्ती दापोली येथेच असून त्याचे वेतन दापोली येथूनच निघते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.