मुरुड समुद्रकिनाऱ्यावर आढळली ऑलिव्ह रिडले कासवाची 2 घरटी; तब्बल 237 अंडी घरट्यात सुरक्षित

मुरुड गाव पर्यटनाप्रमाणे आता कासवांचे गाव म्हणून देखील हळूहळू प्रसिद्ध होत आहे.
Olive Ridley Turtles
Olive Ridley Turtlesesakal
Updated on
Summary

दापोली तालुक्यातील मुरुड गावचा समुद्रकिनारा हा स्वच्छ आणि सुंदर बीच म्हणून जगाच्या नकाशावर याची नोंद आहे.

हर्णै : दापोली तालुक्यातील (Dapoli) मुरुड समुद्रकिनाऱ्यावर (Murud Beach) ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची (Olive Ridley Turtles) दोन घरटी आढळून आली आहेत. एकात ११६ तर दुसऱ्यात १२१ अंडी आहेत. दापोली तालुक्यात या हंगामात पहिल्यांदाच मुरुड समुद्रकिनाऱ्यावर एकाच महिन्यात ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या अंड्यांची दोन घरटी तयार झाली आहेत.

या घरट्यातून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच कासवाची पिल्ले समुद्राकडे झेप घेतील, अशी माहिती येथील जीवरक्षक राजेश शिगवण यांनी दिली. दापोली तालुक्यातील मुरुड गावचा समुद्रकिनारा हा स्वच्छ आणि सुंदर बीच म्हणून जगाच्या नकाशावर याची नोंद आहे. मुरुड गाव पर्यटनाप्रमाणे आता कासवांचे गाव म्हणून देखील हळूहळू प्रसिद्ध होत आहे.

Olive Ridley Turtles
Olive Ridley Turtle : मुरूडनंतर दापोली समुद्रकिनारी आढळले ऑलिव्ह रिडले कासवांचे 80 अंड्यांचे घरटे

गेल्या वर्षी ७ जानेवारी २०२३ रोजी पहिलं घरटं आढळून आले होते, तर एप्रिल २०२३ मध्ये शेवटचं घरट सुरक्षित केल होतं. गेल्यावर्षी अंदाजे २९८० अंडी सुरक्षित केली होती आणि त्यातून अंदाजे १५५५ पिल्ले सोडली होती, अशी माहिती शिगवण यांनी दिली.

Olive Ridley Turtles
आता कास पठारावरील पर्यटन बारमाही सुरू राहणार? जीप सफारीतून पर्यटकांना अनुभवता येणार निसर्गाचा आविष्कार

पर्यावरणपूरक उपक्रम

गेली सुमारे १५ वर्षे या किनाऱ्यावरून हजारो कासवांची अंडी (Turtle Eggs) संरक्षित करून ५४ दिवसांच्या कालावधीनंतर अंड्यांमधून बाहेर येणाऱ्या पिल्लांना समुद्रात सोडले जाते. नुकतेच मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर ९ डिसेंबर २०२३ या दिवशी एक मादी कासव अंडी घालून गेल्याचे दिसून आले. ११६ कासवांची अंडी दिसून आली. त्यानंतर २७ डिसेंबर २०२३ यादिवशी दुसरे १२१ अंड्यांचे घरटे आढळून आले दोन्हीही घरटी जीवरक्षक राजेश शिगवण व त्यांच्या सहकाऱ्यांनी संरक्षित केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.