Dapoli Assembly Election 2024 : उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद; दापोलीत सरासरी ६० टक्के मतदान

Dapoli Vidhan Sabha Election 2024 : दापोली विधानसभा मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले असून, नऊ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले आहे.
Dapoli Assembly Election
Dapoli Assembly Election 2024Sakal
Updated on

दापोली: विधानसभा मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले असून, नऊ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले आहे. २३ तारखेला या बंदिस्त मशीनमधून कोणाचं नशीब आजमावणार, याकडे येथील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

विद्यमान आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम, मनसेचे उमेदवार संतोष अबगुल, बसपाचे उमेदवार प्रवीण मर्चंडे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. या निवडणुकीमध्ये तीन योगेश कदम व तीन संजय कदम अशी नामसाधर्म्य असणाऱ्या सहा व्यक्ती होत्या. यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

आजच्या निवडणुकीमध्ये २ लाख ९१ हजार २९७ मतदार होते. यापैकी ६० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहेत. याकरिता १७२४ कर्मचाऱ्यांची व ४७० ईव्हीएम मशीनची नियुक्ती केलेली होती. याकरिता ५७ एसटीच्या गाड्या व तीन मिनीबसचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. हे कर्मचारी मंगळवारी सकाळी आपापल्या केंद्रांवर रवाना झाले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली.

निवडणुकीत केवळ नऊ उमेदवार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रात केवळ एक मशीन होते. मतमोजणी २३ नोव्हेंबरला बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये होणार आहे. या निवडणुकीकरिता दापोली विधानसभा निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. सुमित जरंगण यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

या निवडणुकीसाठी गृहरक्षक दलाचे १४७ जवान, वनविभागाचे १० कर्मचारी, सहा. पोलिस अधिकारी, ५० पोलिस कर्मचारी व सीमा सुरक्षादलाचे ९० कर्मचारी तैनात होते, अशी माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली.

ही निवडणूक विद्यमान आमदार योगेश कदम व माजी आमदार संजय कदम यांनी प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना पक्षाच्या विभाजनानंतर पहिल्यांदाच दापोली विधानसभा मतदार संघ निवडणुकीला सामोरे जात आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या.

दुपारनंतर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्यांचे मतदान झालेले नाही त्यांना मतदान केंद्रात आणण्याचे काम केले. यामुळे संध्याकाळनंतर मतदान केंद्रांवर पुन्हा गर्दी पाहायला मिळाली. हर्णै बंदरामध्ये सुमारे मतदानाकरिता सर्वच नौका हजर झाल्या होत्या. हर्णै बंदर आणि आंजर्ले खाडीत शाकारण्यात आल्या होत्या.

Dapoli Assembly Election
Kokan Accident: दुचाकी- टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

चाकरमान्यांची सोय

मुंबईतील चाकरमान्यांसाठी गाड्यांची सोय दापोलीतील सुमारे ३५ हजार मतदार मुंबई येथे आहेत. त्यांना दापोलीत मतदानाला आणण्याकरिता राजकीय पक्षांच्यावतीने गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती; मात्र यातील बहुतांश गाड्या आयत्यावेळी न आल्याने मतदार मतदानासाठी हजर राहू शकले नाही. त्यामुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे.

केंद्रावरील कर्मचारी अस्वस्थ

हर्णै व विसापूर येथील मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला. येथे तत्काळ दुसरे मतदान यंत्र तेथे उपलब्ध करून देण्यात आले. इळणे मतदान केंद्रावर नेमणूक असलेल्या एका कर्मचाऱ्याला काल रात्री कर्तव्यावरच असताना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना तेथून तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

Dapoli Assembly Election
Dapoli Temperature : दापोली तालुक्यात भरली हुडहुडी, तापमान 9.4 अंशावर; आंबा, काजू कलमांवर परिणाम

नौकामालकांनी आज मतदान आहे सांगून तुम्ही सर्वजण मतदानाला निघून या. त्याप्रमाणे आम्ही हर्णै बंदरात नौका घेऊन आलो आणि आज मतदान करून पुन्हा मासेमारीला जाणार आहोत.

- बाळकृष्ण गौऱ्या काळपाटील, खलाशी, हर्णै

देशाच्या हितासाठी आज मला पहिल्यांदा नवीन मतदार म्हणून मतदान करायला मिळाले. माझा हक्क मला बजावायला मिळाला याचा मला खूप आनंद होत आहे.

- धनश्री फडके, नवमतदार

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.