ओरोस : अमानुष झुंजीत 'बाबू' बैलाचा मृत्यू

अनधिकृत स्पर्धा प्राणी प्रेमींकडून होतेय कारवाईची मागणी
 'कोकण किंग'
'कोकण किंग' sakal
Updated on

ओरोस: पर्यटनाचे केंद्र लाभलेल्या जिल्ह्यातील एका तालुक्यात जिल्हा मुख्यालयाच्या बॉर्डरवर असलेल्या एका गावात २८ मार्चला बैल झुंजीची 'कोकण किंग' ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 'बाबू' नावाच्या एका बैलाचा मृत्यू झाला. राजकीय पाठबळावर झालेल्या या अनधिकृत स्पर्धेबाबत पोलिसही मूग गिळून गप्प आहेत. एका राजकीय व्यक्तीच्या 'अर्जुन' नावाच्या बैलाने 'कोकण किंग' हा किताब मिळविल्याचे बोलले जात आहे; मात्र या मुक्या प्राण्यांच्या या जीवघेण्या स्पर्धेला बंदी असताना ही स्पर्धा घेतली गेल्याने व यात एका बैलाचा मृत्यू झाल्याने यावर सोशल मीडियामध्ये टीकेची झोड उठली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यावर अक्षरशः अंगावर काटा येतो. व्हिडिओ बघता बघता डोळे मिटतात. कारण व्हिडिओ पुढे बघवतच नाही. हा व्हिडीओ पाहिल्यावर चटकन मनाकडे येऊन जाते ईतका सैतानी वृत्तीचा कधी झाला कोकणी माणुस? जो कोकणी माणुस आपल्या जिवापेक्षा आपल्या गुराढोंराना जपायचा. तो आज समोर रक्तबंबाळ झालेल्या बैलांना बघुन आसुरी आनंद घेत होता. आपल्या ताटातला घास आपल्या बाळ्या, ढवळ्याला भरवणारी आपली संस्कृती. पाडसांना खांद्यावर घेऊन मिरवणारी आपली संस्कृती. जनावरांना देव मानून पूजा करणारी संस्कृती आपली. आज त्यांच्या आयुष्याचा असा जिवघेणा खेळ कधीपासुन करायला लागली.

या व्हिडीओमध्ये अर्जुन बैल दुसऱ्या प्रतिस्पर्धी बाबू नावाच्या बैलाला अक्षरशः रक्तबंबाळ करतो. त्याचा पाठलाग करुन मारतो. तो जमिनीवर तडफडत असताना त्यांच्या अंगावर उभा राहतो. त्यानंतर ही झुंज संपते. माणुसकी गमावलेली व प्राणी प्रेम आटलेली माणसे त्यानंतर जिंकणाऱ्या बैलाच्या गळ्यात दोरी टाकून त्याला बाजूला नेतात. आपला बैल जिंकला म्हणून उड्या मारून व आरडाओरडा करून आनंद साजरा करतात; मात्र त्याचवेळी दुसरा एक मुका प्राणी आपल्या आयुष्याची शेवटची घटका मोजत आहे, याची त्यांना फिकीर दिसत नाही. आपल्याला आसुरी आनंद मिळण्यासाठी एका बैलाचा जीव गेल्याची खंत त्यांच्या मनावर दिसत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर या विरोधात जोरदार ताशेरे ओढले जात आहेत. तडफडणार्‍या बैलाला बघुन त्यांना काहीच नाही का वाटलं? त्या गर्दीतील एकाही माणसात थोडी देखील माणुसकी शिल्लक नाही का राहीली? अशा संपप्त प्रतिक्रिया सोशल मिडियावर येत आहेत.

आयोजकांवर कारवाई करण्याची होतेय मागणी

वस्तुतः बैल झुंजीवर बंदी आहे. बैल झुंजी लावल्या गेल्यातर त्यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलिसांना आहेत; मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून काही किलोमीटर अंतरावर २८ मार्चला ही जीवघेणी स्पर्धा झालेली असताना गेल्या चार दिवसांत याबाबत पोलिसांनी माहिती मिळाली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या अमानुष झुंजी लावून एका मुक्या प्राण्याचा बळी घेतल्याने आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्राणी प्रेमी व सोशल मीडियातून जोर धरू लागली आहे.

मार बाबू मार

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये 'मार बाबू मार' अशी ओरड उपस्थित प्रेक्षक मारताना ऐकू येत आहे. मालवणी भाषेत झुंजी दरम्यान संभाषण ऐकू येते. झुंज खेळणाऱ्या ज्या बैलाला 'बाबू' अशी हाक मारून 'मार' म्हणून प्रोत्साहन देण्यात येत होते. त्याच बैलाला या झुंजीमध्ये दुर्दैवीपणे प्राण गमवावे लागले आहेत. त्यानेच या जगाचा निरोप घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.