आठवड्याभरापूर्वी ओटवणे येथील साहील सद्गुरू केळुसकर (वय २२) याने आपल्याला काम नाही म्हणून गळफास लावून आत्महत्या केली होती.
सावंतवाडी : ‘आयुष्यात ‘स्ट्रगल’ करणे खूप कठीण आहे; तसे माझ्या घरातील लोकांना समजावून सांग,'' असा ‘मेसेज’ आपल्या खास मित्राला मोबाईलवर पाठवून शिरशिंगे-वीरवाडी येथील तरुणाने काल (सोमवार) माजगाव येथे भाडेतत्त्वावरील घरात आत्महत्या केली.
साहिल सुनील राऊळ (सध्या रा. माजगाव, मूळ रा. शिरशिंगे) असे त्याचे नाव आहे. तो चार दिवसांपूर्वी माजगाव येथे राहायला आला होता. याबाबत ठाणे अमलदार रामदास जाधव यांनी दिलेली माहिती अशी : साहिल मूळ शिरशिंगे येथे राहत होता. त्याने आयटीआयचे शिक्षण घेतले होते.
चार दिवसांपूर्वी तो माजगाव-उद्यमनगर येथील एका कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून तर सायंकाळी शहरातील एका चायनिज कॉर्नरमध्ये काम करीत होता. गेले काही दिवस त्याला नैराश्य आले होते. त्याने दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मित्र सुंदर राऊळ याला मेसेज पाठविला. तो वाचून सुंदर याने त्याला नेमके काय झाले, हे विचारण्यासाठी फोन केला. परंतु, त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे त्याने तत्काळ याची माहिती भाऊ न्हानू राऊळ याला दिली आणि दोघेही माजगावात आले.
साहिलच्या खोलीत जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यावेळी साईलचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार हवालदार हनुमंत धोत्रे व सहकारी तेथे गेले. त्यांनी पंचनामा केला. याबाबत येथील पोलिस ठाण्यात नोंद आहे. सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साहिल याच्या मागे आई, वडील असा परिवार आहे.
दरम्यान, आठवड्याभरापूर्वी ओटवणे येथील साहील सद्गुरू केळुसकर (वय २२) याने आपल्याला काम नाही म्हणून गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याने आपल्या चिठ्ठीत तसे नमूद केले होते. ही घटना ताजी असताना अगदी सातव्या दिवशी दुसऱ्या साहिलने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच अनेकांचे मन सुन्न झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.