बाजार समितीची विभागीय कार्यालये 'यासाठी'  बंद करण्याचा निर्णय

Decision To Close Offices Of Market Committee Ratnagiri Marathi News
Decision To Close Offices Of Market Committee Ratnagiri Marathi News
Updated on

रत्नागिरी - बाजार समितीच्या उत्पन्नात भर टाकणे आणि व्यवस्थापनातील वायफळ खर्च कमी करण्यासाठी सभापती संजय आयरे यांनी तीन विभागीय कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून वर्षाला पावणेदोन लाख रुपयांची बचत होणार आहे. तसेच अत्यल्प उत्पन्न देणारी नाकेही बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कृषी बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची निवड काही दिवसांपूर्वी झाली. सभापतिपदाचा भार स्वीकारल्यानंतर संजय आयरे यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरवात केली. मागील वेळी उपसभापतिपदावर काम करताना बाजार समितीच्या घटत्या उत्पन्नाची त्यांना कल्पना होती. राज्यातील बहुतांश बाजार समितीची परिस्थिती गंभीर आहे. त्यात रत्नागिरी बाजार समितीला मच्छीवरील सेस हा एकमेव उत्पन्नाचा मोठा आधार आहे. तपासणी नाक्‍यांवर भाजीमधून मिळणारा सेस अत्यल्प आहे. पद निवडीपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी बाजार समितीच्या कारभाराबाबत चिंता व्यक्‍त केली होती. कारभार व्यवस्थित हाकला जावा यासाठी आयरे यांच्याकडे कारभाराची सूत्रे सोपवली होती. त्याला उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्यासह सगळ्यांनीच संमती दिली होती.

पदभार स्वीकारल्यानंतर आयरे यांनी दापोली, चिपळूण, लांजा येथील विभागीय कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. तेथून काहीच उत्पन्न नाही, उलट खर्चच होतो. वीजबिल, भाडे यापोटी तिन्ही कार्यालयाचा मिळून महिन्याला 14 हजार 500 रुपयांचा भूर्दंड बाजार समितीला बसतो. वर्षाला सुमारे 1 लाख 74 हजार रुपयांची बचत होणार आहे. आस्थापनेवर होणारा खर्च पडताळून तो कमी केला जात आहे. कमी उत्पन्न देणारे नाके बंद करण्याचा विचारही सुरू आहे. मच्छीवरील सेस वसुलीत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत. नुकतीच रत्नागिरीतील काही मच्छीमांराशी चर्चा झाली आहे. हर्णै येथील मच्छीमारांबरोबर ते चर्चा करणार आहेत.

लिलावगृह देणार मोफत

बाजार समितीच्या आवारात 1 कोटी 32 लाख रुपये खर्च करुन उभारलेल्या आंबा लिलावगृहात बागायतदारांनी यावे यासाठी चर्चा झाली आहे. हे लिलावगृह मोफत दिले जाणार आहे. या ठिकाणी परराज्यातील खरेदीदार यावेत यासाठी यंदा प्रयत्न करणार असल्याचे आयरे यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.