Amboli Ghat : आंबोली घाटातील अवजड वाहतूक बंदी धाब्यावर; थेट पोलिसांवरच कारवाई करण्याची मागणी

आंबोली घाटातून (Amboli Ghat) अवजड वाहतुकीला बंदी आदेश असतानाही या घाटातून वाहतूक होत आहे.
Amboli Ghat Traffic Ban
Amboli Ghat Traffic Banesakal
Updated on
Summary

आरटीओ विभागाकडून माहितीच्या अधिकारात प्राप्त करून घेतलेल्या कागदपत्रानुसार या घाटातून तब्बल ५५ टन एकशे चाळीस किलो वजनाच्या गाड्यांची वाहतूक झाली आहे.

सावंतवाडी : आंबोली घाटातून (Amboli Ghat) अवजड वाहतुकीला बंदी आदेश असतानाही या घाटातून वाहतूक होत आहे. मात्र, याप्रकरणी आंबोली पोलिस (Amboli Police) अणि बावळट पोलिस चौकी यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधितांवर रस्त्याच्या परिस्थितीला जबाबदार धरून फौजदारी कारवाई करावी व त्यांची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन लेखी तक्रार करणार असल्याचे श्री. बरेगार यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आपण आंबोली घाटात होणाऱ्या वाहतुकीबाबत माहितीच्या अधिकारात माहिती प्राप्त करून घेतली.

Amboli Ghat Traffic Ban
बंगळूर, हुबळी, बेळगाव विमानतळाची नावं बदलणार? 'या' महान व्यक्तींच्या नावासाठी आमदार आग्रही

आंबोली घाटात २०१९ पासून अवजड वाहने

त्या माहितीद्वारे उघड झाले आहे की, आंबोली घाटात २०१९ पासून अवजड वाहने, दहा चाकी गाड्या तसेच २० टनांच्या वर असलेल्या गाड्यांना, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस खाते व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त पाहणी अहवाल, शिफारसी यांना अनुसरून बंदी आदेश दिलेले आहेत.

Amboli Ghat Traffic Ban
Panchganga River : पंचगंगा नदीवरील 133 वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा; काय आहे कारण?

ओव्हर लोड वाहतुकीबाबत दंडात्मक कारवाई

आरटीओ विभागाकडून माहितीच्या अधिकारात प्राप्त करून घेतलेल्या कागदपत्रानुसार या घाटातून तब्बल ५५ टन एकशे चाळीस किलो वजनाच्या गाड्यांची वाहतूक झाली आहे. या गाडीवर केवळ ओव्हर लोड वाहतुकीबाबत दंडात्मक कारवाई झालेली आहे. परंतु, बंदी घातलेल्या मार्गावरून घाटरस्ता दुरवस्थेस कारणीभूत ठरल्याकामी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच बंदी आदेश तोडून वाहतूक केल्याप्रकरणी पोलिस खाते, (आंबोली पोलिस चौकी, बावळट पोलिस) यांनी काहीच कारवाई केलेली नाही.

रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार कोण?

या सर्व खात्यांतील अधिकाऱ्यांवर रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार धरून फौजदारी कारवाई करावी, झालेल्या रस्त्याच्या दुरवस्थेस येणारा सर्व खर्च त्यांच्याकडून भरपाई म्हणून घ्यावा व कर्तव्यात कसूर केल्याबाबत त्यांना लागू होणाऱ्या सेवाशर्थीनुसार विभागीय चौकशी करावी, अशी मागणी श्री. बरेगार यांनी केली आहे.

Amboli Ghat Traffic Ban
तिरुपती बालाजीला जाताय? मग, ही बातमी आधी वाचा; कोल्हापुरातून थेट विमानसेवा झालीये बंद, काय आहे कारण?

अवजड वाहनांना वाहतूक करू देऊ नका

सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी घाटातून अवजड वाहनांना वाहतूक करू देऊ नये, या आशयाचे पत्र सावंतवाडी पोलिस ठाण्याला २०१९ ला दिले आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने आंबोली पोलिस ठाण्याला या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत आजपर्यंत आदेश दिलेले नाहीत. याबाबत श्री. बरेगार यांनी माहितीच्या अधिकारात सावंतवाडी पोलिस ठाण्याकडून माहिती प्राप्त करून घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.