महाविकास आघाडीने मला हटवून भूखंड हडपण्याचा केला डाव

Deputy Mayor Nishikant Bhojane  Allegations for mahavikas aaghadi
Deputy Mayor Nishikant Bhojane Allegations for mahavikas aaghadi
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : ‘‘उपनगराध्यक्षपदावर बसल्यापासून मी कधीही नगराध्यक्षपदाची प्रभारी जबाबदारी स्वीकारलेली नाही. कोणतेही निर्णय घेतले नाहीत. माझ्याकडून कोणत्याही चुका झालेल्या नाहीत. ज्या २० नगरसेवकांनी सभेची मागणी केली आहे, यातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि अपक्ष नगरसेवक पूर्वी भाजपबरोबर होते. त्यांनी यापूर्वीच शिवसेनेच्या विरोधात मतदान केले आहे. वेळप्रसंगी मी न्यायालयात जाईन,’’ असे सांगत, मला उपनगराध्यक्षपदावरून हटवून पालिकेतील भूखंड हडप करण्याचा डाव महाविकास आघाडीने आखला आहे, असा आरोप उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांनी केला.
 

येथील पालिकेची सभा उद्या (ता. १७) आयोजित केली आहे. या सभेत उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्यावर महाविकास आघाडीकडून अविश्‍वास दाखल करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सभा रद्द करण्याची मागणी भोजने यांनी नगराध्यक्षांकडे केली आहे. सभा रद्द न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा भोजने यांनी दिला आहे. त्यामुळे उद्या नेमक्‍या कोणत्या नाट्यमय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिपळूण पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपची साथ सोडल्यानंतर भाजप अल्पमतात आली आहे. तीन वर्ष सत्तेबाहेर असलेल्या शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून साथ दिल्यामुळे सध्या शिवसेना जोषात आहे. 

उपनगराध्यक्षपदही काढून घेण्यासाठी हालचाली
नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांकडे पदसिद्ध असलेल्या समित्या सोडल्यास सर्वच समित्या सेना, भाजप आणि काँग्रेसने पदरात पाडून घेतल्या आहेत. उपनगराध्यक्षपदही भाजपकडून काढून घेण्यासाठी आता हालचाल सुरू झाली आहे. आघाडी अविश्‍वास ठराव जिंकेल आणि भोजनेंचे पद जाऊन तेथे महाविकास आघाडीचा उपनगराध्यक्ष बसेल, हे स्पष्ट आहे; मात्र ही सभाच होऊ द्यायची नाही, यासाठी विद्यमान उपनगराध्यक्ष भोजने यांचे प्रयत्न सुरू आहेत.

नगराध्यक्षांच्या भूमिकेवर लक्ष
उपनगराध्यक्षांवर अविश्‍वास आणण्यासाठी महाविकास आघाडीने नगराध्यक्षांकडे सभेची मागणी केली आहे. भोजनेंनी सभा रद्द करण्याची मागणी नगराध्यक्षांकडे केली होती. सभा झाल्यास भोजनेंचे उपनगराध्यक्षपद जाणार, हे निश्‍चित आहे. त्याचा तोटा भाजपलाच होणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षा नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.