...पुन्हा उभे राहायचेय कोरोना सोबत ही लढायचे ; नवा मार्ग शोधत

The description of the cyclone from the poem Nature's Wrath
The description of the cyclone from the poem Nature's Wrath
Updated on

मंडणगड (रत्नागिरी) : निसर्ग चक्री वादळात मंडणगड तालुक्यात प्रचंड हानी झाली आहे. सर्वांत जास्त तडाखा हा किनारी व खाडीपट्ट्यातील गावांना बसला आहे. वेळास, साखरी, खारी, आंबवली, जावळे, बाणकोट, वेसवी, वाल्मिकी नगर, गुडेघर, पन्हळी, वेरल, उमरोली, घुमरी, निगडी, आंबवणे बुद्रुक, गोठे, पणदेरी अशा अनेक खाडीपट्ट्यातील गावांसह तालुक्यातील एकूण १०९ गावे बाधित झाली.

घरे, आंबा काजूच्या बागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. वादळाचा प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्यांचा थरकाप उडाला. वादळांतर डोळ्यांच्या नजरेला पडलेले दृश्य अनेकांचे काळीज पिळवटून जाणारे ठरले. अनेक संसार उध्वस्त झाले, कोलमडले. तालुक्यातील आंबवणे बुद्रुक या गावालाही या वादळाचा प्रचंड फटका बसला असून या गावातील अंकित खेरटकर या तरुण कवीने ' निसर्गाचा प्रकोप ' या कवितेतून चक्री वादळाचे वर्णन करताना यातून नवा मार्ग शोधत पुन्हा उभे राहायचे अशी भावनिक हाक दिली आहे.

निसर्गा असा कसा आलास
निसर्गाचे रौद्ररूप घेऊन
वाऱ्यासोबत पाऊस आला
बघ गेला माझं सगळं घेऊन

तुटलेले घर पाहिले
आणि मन ही तुटले
आसवे तरी कशी गाळू
आज ते ही गोठले

भिंतींनी ही त्या वाऱ्यात
खूप काळ तग धरला
मायेने त्यांना बांधलं होत
त्यामुळेच त्यांनी आधार दिला

खिडक्यांनी आपल्या डोळ्यांनी
वारा पावसाचे खेळ पाहिले
त्यांनीही आसवे गाळली
जेंव्हा घराचे छत मोकळे झाले

पुन्हा उभे राहायचे आहे
कोरोना सोबत ही लढायचे आहे
संकटे खूप आहेत वाटेवर
पण एक नवा मार्ग शोधायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.