खेड (रत्नागिरी): कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या निसर्ग वादळाची (Nisarg Cyclone)राहिलेली मदत आणि या वर्षीच्या तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान एकत्रितपणे देण्यात यावे अशी आग्रही मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis)यांनी दिली आहे. रत्नागिरीतील खेड येथे दौऱ्यादरम्यान त्यांनी माहिती दिली. खेड तालुक्यातील बोरज येथे चक्रीवादळात विजेची तार तुटून घोसाळकर पती-पत्नीचा मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबाची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
devendra fadnavis visits ratnagiri khed mango grovers kokan Tauktae cyclone marathi news
प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, घोसाळकर कुटुंबियांचा मुलगा आयटीआय झाला आहे. त्याच्या शिक्षणा प्रमाणे एम एस इ बी मध्ये नोकरी मिळावी यासाठी देखील मी सरकारशी पाठपुरावा करणार आहे.
यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी रविंद्र चव्हाण उपस्थित होते. प्रांत अधिकारी सोनोने यांनी अपघाताची माहिती दिली. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे भूषण काणे,संजय बुटाला, विनोद चाळके, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्यासह बोरज गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
devendra fadnavis visits ratnagiri khed mango grovers kokan Tauktae cyclone marathi news
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.