Devihasol Katal Shilp : कोकण कातळशिल्पांमध्ये आढळून आली सर्वात मोठी कातळशिल्प रचना; नेमका काय आहे 'चौकोनी पट'?

Devihasol Katal Shilp : प्राण्याच्या आकाराशी मिळत्याजुळत्या आणि प्राणीवर्गातील चित्ररचना हेही कोकणातील कातळशिल्पांचे वैशिष्ट्य आहे.
Devihasol Katal Shilp
Devihasol Katal Shilpesakal
Updated on
Summary

आजतागायत कोकणातील कातळशिल्प रचनांमधील आढळून आलेली सर्वात मोठी मनुष्याकृती आहे. मनुष्यसदृश चित्ररचनेतील ३२ फूट लांबीची रचनाही येथे आढळली आहे.

राजापूर : उठावाचे चित्र असल्याचा भास निर्माण करणाऱ्या साधारण चौकोनी आकाराच्या अत्यंत क्लिष्ट आणि आकाराने भल्या थोरल्या रचना हे कोकणातील कातळशिल्पांच्या (Katal Shilp Konkan) रचनांमधील अनेक वैशिष्ट्य आहे. कोकणाव्यतिरिक्त जगामध्ये अन्य कोठेही न आढळणाऱ्या या कातळशिल्पांना ‘चौकोनी पट’ म्हणून ओळखले जाते. या सर्व चित्ररचनांमध्ये एकाही पाळीव प्राण्यांचे चित्रण आढळून आलेले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.