Angarki Chaturthi 2024 : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत फुलला भक्तिमळा; वर्षातील एकमेव अंगारकी चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी

Angarki Chaturthi 2024 Latest News : श्री. बल्लाळेश्वर मंदिर व गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच श्री. बल्लाळेश्वरला देखील आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते.
devotees gathered at shri ballaleshwar ashtavinayak temple in Pali only Angaraki Chaturthi of the year
devotees gathered at shri ballaleshwar ashtavinayak temple in Pali only Angaraki Chaturthi of the year
Updated on

पाली, ता. 25 (वार्ताहर) या वर्षातील एकमेव अंगारकी संकष्टी चतुर्थीला मंगळवारी (ता.25) अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत श्री. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे पासूनच दर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या. पालीत जवळपास पन्नास हजार हून अधिक भाविक दाखल झाले होते.

श्री. बल्लाळेश्वर मंदिर व गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री. बल्लाळेश्वरला देखील आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते. तसेच मंदिरा बाहेर रांगोळी देखील काढण्यात आली होती. वर्षातील ही एकमेव अंगारकी चतुर्थी असल्यामुळे श्री. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून व भारतातून भाविक दाखल झाले होते. यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल झाली असून येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत.

भाविकांमुळे येथील हॉटेल व्यावसायिक, लोजिंग बोर्डिंगवाले, पापड, लोणचे मिरगुंड विक्रेते, पेढेवाले, सरबतवाले, छोटेमोठे दुकानदार व इतर व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता. मंदिर परिसरातील दुकाने व हाॅटेल ग्राहकांनी गजबजले होते. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीन चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विविध वस्तूंनी भरलेली दुकाने व गर्दी यामुळे मंदिर परिसर गजबजलेला दिसत होता. अनेक भाविक स्वतःची वाहने घेवून आले होते. तर काही लक्झरी किंवा खाजगी बसेसने आले. यामुळे पालीतील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

devotees gathered at shri ballaleshwar ashtavinayak temple in Pali only Angaraki Chaturthi of the year
Chang'e-6 Mission : चीनच्या 'चँग -६' चंद्रयानाचा पराक्रम! अमेरिकेच्या 'नासा'लाही जमलं नाही ते दाखवलं करून

आदिवासींना रोजगार

अनेक आदिवासी महिला आंबे, कोकम, जांभळे करवंद आदी रानमेवा घेऊन विक्रीसाठी बसल्या होत्या. भाविकांनी मोठ्या प्रमाणात हा रानमेवा खरेदी केला त्यामुळे आदिवासी महिलांना रोजगार मिळाला.

व्यवसाय चांगला

वर्षातील फक्त एकच अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. या भाविकांनी दुकानातून चांगली खरेदी केली. त्यामुळे धंदा चांगला झाला आहे.

राहुल मराठे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर मंदिर

devotees gathered at shri ballaleshwar ashtavinayak temple in Pali only Angaraki Chaturthi of the year
Nilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर निलेश लंकेंची दणक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, मला त्यांनी...

एकमेव अंगारकी चतुर्थी असल्यामुळे भाविकांच्या येणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन योग्य व्यवस्थापन व नियोजन करण्यात आले आहे. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद (भोजन) उपलब्ध आहे. सुरक्षारक्षक तैनात आहेत. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त आधुनिक भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्वतोपरी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. - जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.