सर्व मृतांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार: मंडणगडमधील प्रकार

सर्व मृतांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार: मंडणगडमधील प्रकार
Updated on

मंडणगड (रत्नागिरी) : मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात मंडणगड शहरातील गांधीचौक येथील एकाच स्मशानभूमीचा वापर कोविड व नॉन कोविड (Covid and non-covid)मृतांच्या अंत्यविधीसाठी होत असल्याचे पुढे आले आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता कोरोनाने मृत रुग्णांवर स्वतंत्र ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याबाबतच्या हालचाली मंडणगड नगरपंचायतीने (Mandangad Nagar Panchayat)केल्या आहेत.

diad cremated in one place mandangad kokan marathi news

मंडणगड तालुक्‍यात एप्रिल महिन्यात कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. या कालावधीत कोरोनाने मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार कोठे करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. शेवटी नगरपंचायतीने मंडणगड गांधी चौक येथील स्मशानभूमीत कोरोनाने मृत रुग्णांवर अत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली; मात्र यासाठी आवश्‍यक कोणतीही पूर्वतयारी करण्यात आली नव्हती. कोरोनाने मृत झालेले आणि सामान्य कारणाने मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी सुरू होते. एकाच दिवशी दोन ते तीन तासांत दोन मृतदेहांवर संस्कार करण्याचे प्रसंग उद्‌भवले. दोन आठवड्यात दहाजणांवर अंत्यसंस्कार झाले आहेत.

महानगरातील मृत्यूदर लक्षात घेता राज्यातील अनेक शहरात कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था आहे; मात्र मंडणगडमध्ये तशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे स्मशानभूमीच कोरोना संसर्गाचे केंद्र बनण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत होती. याबाबत तक्रारी होऊ लागल्यानंतर मंडणगड नगरपंचायत प्रशासनाने मृतांचे प्रमाण लक्षात घेऊन कोरोनाने मृत रुग्णांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यास नगरपंचायतीने हालचाली सुरू केल्या आहेत.

शहरातील स्मशानभूमीत त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. सरणासाठी आवश्‍यक असणारे लोखंडी स्तंभ मिळवण्यासाठी कार्यवाही सुरू असून आवश्‍यक लाकडे आधीच साठवून ठेवण्यात आली आहेत. नगरपंचायत कर्मचाऱ्यांना पीपीई कीट प्राप्त झाली असून मृतदेह हाताळताना येणाऱ्या अडचणी यामुळे कमी होणार आहेत. नगरपंचायतीचे वरातीमागून घोडे नाचविण्याच्या कार्यपद्धतीबद्दल शहर व तालुकावासीयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

diad cremated in one place mandangad kokan marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.