Dapoli Police : आक्षेपार्ह पोस्टमुळे दापोलीत मोठा तणाव; दोन गटांत सामाजिक अशांतता, शहराला पोलिस छावणीचे स्वरूप

दापोली (Dapoli) तालुक्यात समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटांत सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे.
Dapoli Police
Dapoli Policeesakal
Updated on
Summary

सामाजिक अशांततेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून शहराला छावणीचे स्वरुप आले आहे.

दाभोळ : गेले दोन दिवस दापोली (Dapoli) तालुक्यात समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटांत सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २४) रात्री ९ वाजता दापोली पोलिस व महसूल विभागाने दापोली शहरात (Dapoli Police) कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रूट मार्च काढला.

Dapoli Police
Maratha Reservation : सरकार मराठ्यांचंच आहे, त्यामुळं मराठा समाजानं सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री शिंदे

या सामाजिक अशांततेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. या रूट मार्चमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार अर्चना बोंबे, पोलिस उपअधीक्षक माईनकर, पोलिस निरीक्षक विवेक अहिरे, पोलिस कर्मचारी, शीघ्र कृती दलाचे जवान सहभागी झाले होते.

Dapoli Police
'ऐ मेरे वतन के लोगो..' चीन युद्धातील पराभवानंतर सैनिकांना समर्पित गाणं; लतादीदींच्या गाण्याचे 'हे' आहेत साक्षीदार

दापोली बस स्थानकापासून रूट मार्चला सुरुवात झाली. काळकाई कोंड, खोंडा, बुरोंडी नाका, फॅमिली माळ, बाजारपेठ, मच्छीमार्केट ते पोलिस ठाणे असा रूट मार्चचा मार्ग होता. तालुक्यातील शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी हर्णै, पाजपंढरी, बुरोंडी येथे बंदोबस्त वाढविला असून दापोली शहरातील केळसकर नाका, बस स्थानकाजवळील चौक (आंबा पाँईंट), बाजारपेठ मशीद, जालगाव ग्रामपंचायत येथे बंदोबस्त ठेवला आहे.

याठिकाणी शीघ्रकृती दल, दंगल नियंत्रण पथक तैनात ठेवण्यात आले आहे. सीसीटीव्ही असलेले वाहनही शहरात ठेवण्यात आले असून ड्रोनद्वारे शहरात नजर ठेवली जात आहे. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनीही बंदोबस्ताची पाहणी केली असून जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी रात्री दापोली येथे दाखल झाले आहेत.

Dapoli Police
भाजपच्या 'या' आमदाराची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; एकाच मतदारसंघातून तब्बल 8 वेळा विजयी!

सर्वांनी संयमाने राहावे

दापोलीतील अशांततेच्या पार्श्वभूमीवर दापोली पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांनी घेतली. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होईल किंवा गुन्हा नोंद करायला लागेल अशा पद्धतीचे कोणतेही कृत्य युवकांनी करू नये. आपल्या मर्यादा पाळाव्यात; अन्यथा उद्याच्या भावी पिढीवर विपरित असा परिणाम होऊन त्यांच्या करिअरवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असे माईनकर यांनी सांगितले. आपल्या पाल्यांना, विद्यार्थ्यांना सांभाळा, सर्वांनी संयम राखा, सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश जाईल असे मेसेज व्हायरल करू नका किंवा स्टेटसला ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()