दोडामार्ग : मानवी संघर्षाने हत्ती बिथरले

नुकसानसत्रात वाढ अनेकांचे बळी पिटाळून लावण्यासाठी अमानुष प्रयोग
elephant
elephantsakal
Updated on

दोडामार्ग: जवळपास दोन दशके हत्तींचा वावर जिल्ह्यात आहे. हत्तींनी तीन राज्ये आणि हजारो किलोमीटर अंतर पार केले आहे. या काळात अनेक व्यक्तींचे बळी गेले. कित्येकजण जखमी झाले. हत्ती - मानव संघर्षात अनेक हत्तींचेही बळी गेले. सुरुवातीला देव म्हणून हत्तींना पूजणाऱ्या शेतकरी गावकऱ्यांनी हत्तींचा उपद्रव टाळण्यासाठी अनेक अमानुष प्रयोग करून हत्तींना सळो की पळो करून सोडले. त्यामुळे हत्ती बिथरले आणि आक्रमक झाले.

elephant
Kokan - राजापूरातील रिफायनरीला शिवसैनिकांचे वाढते समर्थन

हत्ती बुद्धिमान आणि शांत स्वभावाचे असतात. त्यांना असुरक्षित वाटले तर ते हल्ला करतात. तत्पूर्वी ते विशिष्ट आवाज काढून समोरच्याला इशाराही देतात. हत्तींचे मांगेलीत सर्वप्रथम आगमन झाले. तेथून ते शिरंगे परिसरात गेले. त्या परिसरात हत्तीच्या एका पिल्लाचा गूढ मृत्यू झाला. त्याने हत्ती सैरभैर, बेचैन आणि आक्रमक झाले. चंदगड तालुक्यातून बांबू तोडण्यासाठी आलेल्या हेरे-गुडवळे येथील कामगाराचा त्यांनी बळी घेतला. तो राज्यातील पहिला बळी होता. हत्तीच्या पिलाचा मृत्यू त्या हल्ल्याला कारणीभूत ठरला. त्यानंतर हत्ती हटाव मोहीम राबविण्यात आली. हत्तींना पकडण्यासाठी पाळीव हत्ती तिलारीत आणले गेले. दुर्दैवाने मोहिमेदरम्यान त्यातील नर माजावर आला आणि आक्रमक झाला. मोहीम सुरू असताना त्याने समोर आलेल्या छायाचित्रकारावर हल्ला केला. सुदैवाने तो वाचला; पण हत्तीच्या रुद्रावतारामुळे मोहीम थांबविली. मदमस्त हत्ती धोकादायक ठरतो हे त्यातून स्पष्ट झाले. नंतरच्या काळात हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र होत गेला. हत्तींच्या अंगावर फटाके टाकणे, पेट्रोल टाकणे. प्रखर विजेरीचे झोत त्यांच्या डोळ्यावर टाकणे, आरडाओरडा करणे या प्रकाराने हत्ती बिथरले. बिथरलेले हत्ती एकतर तो प्रदेश सोडून जातात नाहीतर अधिक आक्रमक होतात. आक्रमक झालेल्या हत्तींनी गोव्यातील रेवाडे परिसरात एका महिलेचा बळी घेतला. जिल्ह्यातील कळणे, पावशी अशा गावातही हत्तींचा कहर दिसला. बळींची संख्या हळूहळू वाढू लागली.

elephant
Kokan Rain Update - शास्त्री, सोनवी, गडनदीला पूर

मधल्या काळात शिरंगे परिसरात एक टस्कर स्थिरावला. माजी सरपंच नारायण नाईक यांच्या जंगलातील घराकडे तो दररोज यायचा. ते त्याला ‘गजा’ म्हणायचे. गजा म्हणून मोठ्याने हाक दिली आणि तो आसपास असला, तर त्यांच्या अंगणात यायचा. नाईक त्यांना भात, फणस घालायचे आणि तो खाऊन निघायचा. ‘गजा’ माणसाळल्याचा तो पुरावा होता. नंतर ‘गजा’ अगदी गूढरित्या गायब झाला. त्याच्या हत्येचा संशय त्यावेळी नाईक यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर जेलुगडे (ता. चंदगड) येथे पाच हत्तींचा शेतात विजेचा शॉक लागून झालेला मृत्यू (की हत्या?) चटका लावणारा होता. कुडाळ तालुक्यातील हत्ती पकड मोहिमेदरम्यान झालेला दोन हत्तींचा मृत्यूही हत्तींचे अस्तित्व धोक्यात आल्याची वर्दी देत होता. हत्तीला फिरण्यासाठी मोठे क्षेत्र लागते. पिण्यासाठी मुबलक पाणी आणि पुरेसे खाद्य लागते; मात्र गेल्या काही वर्षात जंगलाच्या चोहोबाजूने मानवी हस्तक्षेप वाढल्याने हत्तींच्या वावरावर मर्यादा आल्या आहेत.

elephant
Kokan - राजापूरातील रिफायनरीला शिवसैनिकांचे वाढते समर्थन

जंगलाच्या बाजूने सुरू असलेल्या शेतीमुळे, बेसुमार जंगलतोडीमुळे हत्तींची वसतीस्थाने, त्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. दोन जंगलांना जोडणारे मार्ग (कॉरिडॉर) तुटले आहेत. अनेक भागात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हत्ती मानवी वस्तीकडे कूच करीत आहेत. त्यातून मानव आणि हत्ती संघर्ष उभा राहत आहे. गेल्या वीस वर्षात जिल्हावासीयांनी हत्तींचे आगमन, हत्तींबद्दलचा मानवाचा धार्मिकपणा, शेतकऱ्यांचे नुकसान, अनेकांचे उध्वस्त संसार, शासनाचे अपुरे प्रयत्न सारे अनुभवले आहे. आता जिल्हावासीयांनी हत्तींसोबत जगण्याची सवय केली असली तरी भविष्यात माणसाला अभय आणि हत्तींना अरण्य मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आवश्यक आहे.

elephant
kokan : मच्छीमारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा ; सोमवारपासून आंदोलन

हत्तीची काही वैशिष्ट्ये

भारतीय हत्तींमध्ये नरालाच सुळे

सुळे नसलेल्या नराला ‘माखणा’ म्हणतात

इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी

हत्तीचा बुध्यांक चिम्पांझीच्या बुद्ध्यांकाएवढा असतो.

हत्ती कळपातील प्रत्येक सदस्याला ओळखू शकतो

हत्तीची स्मृती त्याच्या कळपापुरती किंवा अधिवासापुरती मर्यादित नसते

लहानपणी संपर्कात आलेल्या व्यक्तीही तो अनेक वर्षांनंतर ओळखतो

हत्तींनी दिलेले ध्वनिसंकेत वाऱ्यासोबत सर्व दिशांना जातात

हत्तीची स्वत: ची भाषा असते

ध्वनीच्या माध्यमातून कळपाशी संपर्क

एखादा आघात किंवा दुःखद घटनेने व्यथित होतो

हत्तीची संवेदनशीलता त्याला अनेक प्रकारच्या संकटांवर उपाय शोधण्यास उपयोगी पडते .

हत्तीला अंकगणिताची देखील चांगली समज असते

हत्ती १२ प्रकारचे ध्वनी किंवा स्वर ओळखू शकतो

हत्ती ऐकलेल्या निरनिराळ्या सुरावटी देखील वाद्यांच्या साह्याने पुन्हा निर्माण करू शकतो

मानवेतर सस्तन प्राण्यांमधील एकमेव सस्तन प्राणी, जो कळपातील मृत सदस्यांचे दफन करतो. शिवाय त्या दफनस्थळाला भेट देतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.