Maratha Reservation : OBC मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका, त्यांना स्वतंत्र..; काय म्हणाले रामदास कदम?

३२ गावांमध्ये मी पहिल्यांदा १९९२ ला निवडून आलो होतो.
Ramdas Kadam Maratha Reservation
Ramdas Kadam Maratha Reservationesakal
Updated on
Summary

‘बाळासाहेब (Balasaheb Thackeray) म्हणाले होते, काँग्रेसबरोबर जाईन तेव्हा माझ्या पक्षाचे दुकान बंद करून टाकेन; पण उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री झाले.'

गावतळे : तिन्ही जिल्ह्यांतील प्रत्येक गावांत कालव्याचे पाणी देऊन तरुणांना रोजगार देणार, असे प्रतिपादन माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केले. दापोली तालुक्यातील भडवळे येथील धरणाच्या भूमिपूजन व जिल्हा परिषद मराठी शाळा नूतन इमारत उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

Ramdas Kadam Maratha Reservation
Murugesh Nirani : काँग्रेस सरकार कधीही पडू शकतं, 50 आमदार भाजपच्या संपर्कात; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

रामदास कदम म्हणाले, ‘बाळासाहेब (Balasaheb Thackeray) म्हणाले होते, काँग्रेसबरोबर जाईन तेव्हा माझ्या पक्षाचे दुकान बंद करून टाकेन; पण उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री झाले. ३२ गावांमध्ये मी पहिल्यांदा १९९२ ला निवडून आलो होतो. स्व. अप्पा गुढगेकर यांनी पहिल्यांदा मला ३२ गावची ओळख करून दिली. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देऊ नका, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, असं माझे मत आहे; पण काहींनी मोडतोड करून माझे भाषण प्रसारित करून गैरसमज पसरवला.

निवडणुकीच्या काळात माझ्याविरुद्ध मुस्लिमविरोधी क्लिपही चालवत होते. धरण ही सुरुवात आहे. अजून ३२ गावांत बराच विकास करणार आहे. कोकणात मुबलक पाऊस पडतो; पण ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. हे पाणी साठवून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत प्रत्येक गावांत कालव्याचे पाणी देऊन येथील तरुणाला रोजगार देणार, असंही त्यांनी सांगितलं.

Ramdas Kadam Maratha Reservation
Tipu Sultan Jayanti : महाराष्ट्रात टिपू सुलतानच्या जयंतीला ताकदीने विरोध करू; 'हिंदू एकता आंदोलन'चा महत्त्वपूर्ण निर्णय

आमदार योगेश कदम म्हणाले, ‘३२ गावांत सर्वात जास्त मते विधानसभा निवडणुकीत मिळाली. रामदास कदम यांनी या भागात काम केल्याने येथे मला प्रेम मिळाले. दापोली नगरपंचायतीमध्ये आपल्याच पक्षाने आणलेल्या संकटावेळी या ३२ गावांनी प्रथम मला साथ दिली. त्यामुळे ४३ कोटी रुपये निधीचे धरण मी येथे दिले आहे. यामुळे ३२ गावच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.’

Ramdas Kadam Maratha Reservation
Love Affair Case : 'मोबाईल नंबर ब्लॉक’ केला म्हणून प्रेयसीला जाळण्याची धमकी; चिडलेल्या प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल..

शेतकऱ्यांनी चिंता करू नये

जलजीवन मिशनचे काम आपण लवकरच पूर्ण करणार आहोत. शेतकऱ्यांनी चिंता करू नये. जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना सर्वात जास्त मोबदला देऊ. वावघर-भडवले पुलासाठी दीड कोटी रुपये मजूर केले आहेत. अनेक लहान-मोठी कामे पूर्ण केली आहेत. वाकवली-उन्हवरे रस्त्यासाठी ६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दापोली उपजिल्हा रुग्णालयासाठी २१ कोटी मंजूर करून घेतले आहेत, असे सांगून कदम म्हणाले, सर्वसामान्य लोकांसाठी सुसज्ज आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.