वैभववाडीकरांनो काळजी घ्या! पिण्याच्या पाण्यात आढळल्या अळ्या

काही महिन्यांपूर्वी गढुळ पाण्यामुळे वैभववाडी शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न चर्चेत आला होता.
वैभववाडीकरांनो काळजी घ्या! पिण्याच्या पाण्यात आढळल्या अळ्या
Updated on

वैभववाडी : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या प्रभाग ३ येथील अनेक कुटुंबाना पिण्याच्या पाण्यात अळ्या सापडल्या. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असुन नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. आज (१४) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. काही महिन्यांपूर्वी गढुळ पाण्यामुळे वैभववाडी शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न चर्चेत आला होता.

नगरपंचायतीच्या माध्यमातुन संपुर्ण शहरात पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान आज सकाळी नेहमीप्रमाणे प्रभाग क्रमांक तीनमध्ये पाणी सोडण्यात आले. सुरूवातीला नळाला येणारे पाणी गढुळ असल्यामुळे नागरिक ते सोडुन देतात. परंतु आज बराच वेळ पाणी गढुळच येत राहिले. यावेळी पाणी भरत असताना पाण्यातून अळ्या येत असल्याचे आढळले. काहींनी सुरूवातीला याकडे शेवाळसदृश्य कचरा म्हणून पाहीले. परंतु पाणी तपासल्यानंतर पाण्यातुन अळ्या येत असल्याचे दिसले.

वैभववाडीकरांनो काळजी घ्या! पिण्याच्या पाण्यात आढळल्या अळ्या
कौजलगीत बनवल्या पर्यावरणपूरक राख्या; गायीच्या शेणाचा वापर

प्रभाग तीनप्रमाणे आणखी एका प्रभागामध्येही पाण्यातून अळ्या येत असल्याचे दिसुन आले. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून नगरपंचायत प्रशासना विरोधात लोकांतून संताप व्यक्त होत आहे. आठ ते दहा दिवसांपासून या प्रभागात गढुळ पाणी येत असल्याच्या तक्रारी नगरपंचायतीकडे नोंदविल्या होत्या. नगरपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मे महिन्यात पावसानंतर पारकोंडजी जवळ विहिरीत पावसाचे गढुळ पाणी शिरले. हे पाणी दुसऱ्या दिवशी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत नगरपंचायत प्रशासन हलगर्जीपणा दाखवत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

वैभववाडीकरांनो काळजी घ्या! पिण्याच्या पाण्यात आढळल्या अळ्या
1947 चा अमृतमहोत्सवी कल्पवृक्ष आजही डौलाने उभा!

"नळपाणी पुरवठा योजनेच्या पाण्यात अळी सापडल्याची माहिती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाठवण्यात आले असुन नळपाणी पुरवठा योजनेची जलवाहीनी कुठे फुटलेली आहे का? हे तपासुन पाहण्यात येणार आहे."

- एस. व्ही. पवार, पाणी पुरवठा विभागप्रमुख, नगरपंचायत, वाभवे, वैभववाडी

"नळाला गढुळ पाणी येत असल्याची कल्पना नगरपंचायत प्रशासनाला पंधरा दिवसांपुर्वी दिली होती. ही दखल न घेतल्यामुळे नळाच्या पाण्यातून अळ्या येत आहेत. ही गंभीर बाब असुन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे."

- मंगेश साटम, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.