Bus Accident : गाडीवरचा ताबा सुटला अन् बस थेट घरातच घुसली; अपघातात चालक ठार, तिघेजण जखमी

बसचे चाक मातीच्या ढिगाऱ्यावर चढल्याने चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याजवळील घरात घुसली.
Bus Accident on Poire-Gondapur Route Devgad
Bus Accident on Poire-Gondapur Route Devgadesakal
Updated on
Summary

बस पोयरे-गोंदापूर येथे आली असता चालक काळे यांचा अचानक बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याजवळ असलेल्या संजय सावंत यांच्या घराला धडकली.

मुणगे : आचऱ्याहून देवगडला (Devgad) जाणाऱ्या बसचे चाक मातीच्या ढिगाऱ्यावर चढल्याने चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याजवळील घरात घुसली. या अपघातात (Bus Accident) चालक बापू लक्ष्मण काळे (वय ५४, रा. तळेरे) गंभीर जखमी झाले. त्यांना ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघात काल (शनिवार) दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर (ता. देवगड) येथे झाला. यात वाहकासह दोन प्रवासीही जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी : आचरा-खुडीमार्गे देवगड बस घेऊन दुपारी चालक बापू काळे निघाले होते. बस दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर येथे आली असता चालक काळे यांचा अचानक बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याजवळ असलेल्या संजय सावंत यांच्या घराला धडकली.

Bus Accident on Poire-Gondapur Route Devgad
Waluj MIDC Fire : छ. संभाजीनगरात मध्यरात्री हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 कामगारांचा होरपळून मृत्यू

मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ प्रकाश पालव, दीपक अपराज, नितीन जोईल, अमर अपराज, प्रथमेश पालव, किशोर पालव, पोयरे उपसरपंच समीर तावडे, मंगेश पालव यांसह ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ मदतकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या चालकाला लोखंडी पाराने दरवाजा तोडून बाहेर काढले. अपघातात चालक काळे यांच्यासह वाहक राजेंद्र मनोहर जाधव व प्रवासी रुही दीनानाथ पडवळ (वय २१) व मिताली प्रवीण मुणगेकर (१९, दोघे रा. कुडोपी) जखमी झाले.

Bus Accident on Poire-Gondapur Route Devgad
मुरुड समुद्रकिनाऱ्यावर आढळली ऑलिव्ह रिडले कासवाची 2 घरटी; तब्बल 237 अंडी घरट्यात सुरक्षित

जखमींना उपचारासाठी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. चालक काळे गंभीर जखमी झाल्याने त्यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घराची भिंत काही प्रमाणात कोसळून बस भिंतीला अडकून एका बाजूला कलंडली. बसमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह अन्य मिळून सुमारे २३ प्रवासी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याच बसमधून प्रवास करणारे पोयरे-गोंदापूर येथील लक्ष्मण दुखंडे यांनी सांगितले की, रस्त्याकडेला खणलेल्या खड्ड्याच्या मातीच्या ढिगावर एसटीचे चाक गेल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला.

Bus Accident on Poire-Gondapur Route Devgad
म. ए. समितीचा विरोध डावलून कन्नड संघटनांच्या दबावापुढं महापालिका झुकली; मराठी-इंग्रजी भाषेतील हटविले होर्डिंग्ज

देवगड पोलिस उपनिरीक्षक सुधीर कदम, हवालदार स्वप्नील ठोंबरे यांनी गोंदापूर येथे येत घटनेचा पंचनामा केला. देवगड एसटी आगार व्यवस्थापक नीलेश लाड, स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनीही धाव घेतली. अपघातानंतर बसमधील प्रवाशांना नातेवाईकांनी वाहनाने घरी नेल्यामुळे अन्य जखमींबाबत माहिती समजू शकली नाही. यावेळी बसचेही मोठे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.