Dry Fish : वडखळमध्ये सुक्‍या मासळी बाजारात गर्दी

वडखळमधील मुख्य बाजारपेठेत सुकी मासळी खरेदी-विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे
dry fish market vadkhal crowd before monsoon food health
dry fish market vadkhal crowd before monsoon food health Sakal
Updated on

वडखळ : सध्या वडखळमधील मुख्य बाजारपेठेत सुकी मासळी खरेदी-विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. विशेष म्हणजे पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील शेकडो नागरिक, पर्यटक पावसाळ्यापूर्वी अगोटीची सुकी मासळी घेण्यासाठी वडखळ, पोयनाडच्या बाजारात येतात. येथील बोंबील, करंदी, सुकी कोळंबी, वाकट्या, मांदेली विशेष लोकप्रिय असल्‍याने खवय्यांकडून मोठी मागणी आहे.

dry fish market vadkhal crowd before monsoon food health
Fresh Fish : ताजी मासळी कशी ओळखाल ?

मत्स्य दुष्काळामुळे ताजी मासळी खाणे अनेकांच्या खिशाला परवडत नाही. मात्र यंदा सुक्या मासळीचा दराने उचल खाल्ली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुक्या मासळीच्या दरात सरासरी १००ते १५० रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी शेकडा ४०० रुपयांनी मिळणारे सुके बोंबील यंदा ५०० रुपये शेकडा मिळत आहेत.

dry fish market vadkhal crowd before monsoon food health
Dry Fish : सुक्या मासळीचे दर गगनाला; खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले

जवळा, करदीचे दर १०० रुपयांनी तर कोळंबी प्रति किलो ४५० ते ५०० रुपये आहे. जवळा ३०० ते ३५० रुपये किलो, पापलेट, सुरमई, बांगडा या माशांची आवक घटल्याने या प्रकारातील सुकी मासळी बाजारात सध्या उपलब्ध नाही. मे महिना सुरू होताच वडखळच्या बाजारपेठेत सुकी मासळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येते.

पावसाळ्यात शेतीची कामे सुरू होतील, त्या वेळी शेतावर काम करणाऱ्या मजुरांचे जेवणासाठी सुकी मासळी आवश्यक असल्याने आताच विकत घेउन ठेवली आहे. यंदा दरात १०० ते २०० रुपयाची वाढ झाली आहे.
- संगीता पाटील, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.