Madhav-Bhandari
Madhav-Bhandarisakal

ई-श्रम कार्ड योजना फायदेशीर

माधव भांडारी; वैभववाडीत नोंदणीबाबत मार्गदर्शन
Published on

वैभववाडी : देशात असंघटित कामगारांचे प्रमाण मोठे असुन हे सर्व कामगार शासनाच्या विविध योजनांपासून दुर राहतात. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-श्रम कार्ड ही योजना आणली आहे. ही योजना असंघटित कामगारांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे मत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले.

प्रवण फार्मर कंपनीच्याच्यावतीने केंद्राने सुरू केलेल्या ई-श्रम पोर्टलवर कामगारांनी नोंदणी कशी करावी? यासंदर्भात मार्गदर्शन शिबीराचे आयोजन येथील राजापुर अर्बन बँकेच्या सभागृहात केले होते. याला सभापती अक्षता डाफळे, प्रणव फार्मर कंपनीचे अध्यक्ष महेश संसारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, उत्तम सुतार, राजू पवार, किशोर दळवी, महेश राणे, लुपीन फांउंडेशन प्रविण पेडणेकर, प्रशांत कुळये उपस्थित होते.

Madhav-Bhandari
राज्याच्या लोकायुक्त कायद्याचा मसुदा अंतिम स्वरूपात

श्री. भांडारी म्हणाले, ``केंद्र सरकार समाजातील शेवटच्या घटक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवित आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील गोरगरीब असंघटित कामगारांसाठी ई-पोर्टल सुरू केले आहे. या योजनेतर्गंत नोंदणी करणाऱ्या असंघटित कामगारांना ई-श्रम कार्ड दिले जाणार आहे. या कार्डच्या माध्यमातुन अनेक योजना कामगारांना शासनाकडुन दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत या योजनेखाली ६८ लाख असंघटीत कामगारांची नोंद करण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाला तर २ लाख रुपये त्याच्या वारसाला केंद्रामार्फत देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करावी. तालुक्यातील असंघटीत कामगारांनी श्रमजीवी लोकांनी, भूमिहीन शेतकऱ्यांनी, अल्प भूधारक शेतकऱ्यांनी, ग्रामीण कारागीर अन्य अल्प भूधारकांनी ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ घ्यावा.

जनधन खात्यामुळे लाभ

भांडारी म्हणाले, की पीएम किसान योजना, जनधन योजनेअंतर्गत भारतातील ३३ कोटी लोकांनी बँकेत खाती उघडली आहेत. या जनधन खात्याच्या माध्यमातून गेल्या ६ वर्षात चांगला लाभ मिळाला आहे.’’ ‘‘तालुक्यातील सर्व असंघटित कामगारांपर्यंत ही योजना प्रवण फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पोहचवली जाणार आहे. या योजनेपासून तालुक्यातील एकही कामगार वंचित राहणार नाही, याची जबाबदारी कंपनीने घेतली आहे,’’ असे कंपनीचे अध्यक्ष महेश संसारे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()