रत्नागिरीत आढळले दुर्मिळ इजिप्शिअन गिधाड

egyptian vulture found in ratnagiri yesterday after long time
egyptian vulture found in ratnagiri yesterday after long time
Updated on

रत्नागिरी : पक्षी निरीक्षकांना निरीक्षणाप्रसंगी येथील चंपक मैदान परिसरात दुर्मिळ इजिप्शिअन गिधाड (पांढरे गिधाड) आढळून आले. निसर्ग चक्रीवादळानंतर ते भटकंती करीत येथे आले असावे, असा अंदाज वर्तविला जातो. यामुळे गिधाडांमधील दुर्मिळ प्रजातीची नोंद येथे झाली आहे.

पक्षीनिरीक्षक आशिष शिवलकर, डॉ. प्रणव परांजपे आणि ॲड. प्रसाद गोखले यांनी या गिधाडाचे छायाचित्र टिपले. इजिप्शिअन गिधाड हे आकाराने लहान असते. भक्ष्याच्या हाडाच्या आतमधील भाग हे गिधाड सर्वाधिक प्रमाणात खाते. याचे मूळ दक्षिण आफ्रिकेत असून, थंडीच्या हंगामात ते राजस्थान, दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्थलांतर करते. कोकणात ते दुर्मिळच आहे. काही महिन्यांपूर्वी रायगड-रत्नागिरीला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका गिधाडांच्या अधिवासाला बसला होता. गिधाडांची घरटी असणारी झाडे उन्मळून पडली. आता परिस्थिती पूर्ववत होऊ लागल्यावर ती आपापल्या निवासस्थानी परतू लागली आहेत.

नऊ वर्षांपूर्वी पिलाचे दर्शन

पक्षीनिरीक्षक भाई रिसबूड, डॉ. रशीद वैद्य, डॉ. सचिन पानवलकर, डॉ. प्रणव परांजपे यांनी पांढऱ्या गिधाडाच्या प्रजातीची नोंद नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ मध्ये केली होती. चंपक मैदान परिसरातील नैसर्गिक पाणीसाठा आटत आल्याने तेथे टॅंकरने पाणीपुरवठा करून या पक्ष्यांना जीवंत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या सहाय्याने करण्यात आला. गिधाडास शिकाऱ्यांपासून वाचविण्यासाठीही प्रयत्न केला आहे.

विशेष निरीक्षण...

  • महाराष्ट्रातून गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद 
  • पांढऱ्या पुठ्ठ्याची, लांब चोचीची आणि पांढरी गिधाडे १९९० आणि त्यापूर्वी मोठ्या संख्येने आढळत होती
  • अपुऱ्या खाद्यपुरवठ्यामुळे गिधाडांची संख्या होतेय कमी 
  • गिधाडांचा समावेश नष्टप्राय श्रेणीतील पक्ष्यांच्या यादीत 
  • रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन तालुक्‍यात आढळतात गिधाडे 
  • कोकणात गिधाडांचा अधिवास  हिमालयीन ग्रिफन गिधाडांचीही नोंद

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.