नगरपालिका निवडणूक उमेदवारीवर डोळा ठेवून पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवून पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.
खेड : नगरपालिका निवडणूका तोंडावर आल्या असल्याने खेडमध्ये दलबदलू राजकारणाला वेग आला आहे. गेल्या काही महिन्यात या पक्षातून त्या पक्षात उडी मारणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. नगरपालिका निवडणूक उमेदवारीवर डोळा ठेवून पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवून पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.
नोव्हेंबर महिन्यात खेड पालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरवात केली आहे. पालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सारेच राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल याचा अभ्यास करून राजकीय पक्षाचे नेते कुणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी करू लागले आहेत. ज्यांना या निवडणुकीत 100 टक्के उमेदवारी मिळणार याची खात्री आहे ते पदाधिकारी पक्षासोबत आहेत. परंतु ज्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री नाही ते पदाधिकारी पक्षनिष्ठा बाजूला ठेवून दुसऱ्या पक्षात प्रवेश करू लागले आहेत.
शिवसेनेत दाखल होणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी या आधी आपापल्या पक्षाचे नगरसेवक पद उपभोगलेले आहे; मात्र या वेळी पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने हे पदाधिकारी शिवबंधन हाती बांधत उमेदवारी मिळण्याची अपेक्षा करत आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि खेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर चिखले यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. चिखले यांच्या सेना प्रवेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये चलबिचल होती. त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आगामी काळात अन्य पक्षाचे आणखी काही पदाधिकारी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.
न पटणारे कारण
पुन्हा एकदा खेडच्या राजकारणात भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड शहराध्यक्ष आणि खेड नागरपालिकेचे माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आपल्याला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नसल्याने आपण पक्ष सोडत असल्याचे चिकणे यांनी म्हटले आहे; मात्र राजकीय समीक्षकांना हे कारण पटणारे नाही. गेल्या निवडणुकीत चिकणे यांचा पराभव झाल्याने व सध्याची पक्षांची स्थिती पाहून चिकणे यांनी हातात शिवबंधन बांधल्याचे बोलले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.